अनेकदा लोकं आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून आराम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाज आणि स्पा ट्राय करतात. काहीजण तर इस्राईल मधील सापांचा मसाज, तर काहीजण टोकियो मध्ये गोगलगाय मसाज करण्यासाठी जातात. भारतात देखील वेगवेगळ्या प्रकारच्या तेल आणि अत्तरांनी केले जाणारे पारंपरिक मसाज प्रसिद्ध आहेत.
त्यातल्या अनेक प्रकारच्या स्पा मध्ये “फिश स्पा” सुद्धा चांगलाच प्रसिद्ध आहे, ज्यात मासे पायाच्या मृत पेशी खातात. मागच्या काही काळापासून पेडिक्युअर पद्धती लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. पण एखाद्या लोकप्रिय वस्तू किंवा व्यक्तीबाबत जशी वाईट गोष्ट घडते, तेच या फिश स्पा उपचार पद्धतीबाबत घडले आहे.
काय घडले होते ?
ऑस्ट्रेलिया देशातील २९ वर्षीय व्हिटोरीया नावाच्या मुलीची हि गोष्ट आहे. २००६ साली तीच्या पायात काच बुडाली होती. त्यामुळे तिच्या पायाला इन्फेक्शन झाले. उपचार केल्यावर तिचा पाय बरा झाला. त्यानंतर २०१० साली व्हिक्टोरिया थायलंडला फिरण्यासाठी गेली होती. तिथे तिने फिश पेडिक्युअर केले. थायलंड वरून परत आल्यानंतर तिला ताप चढला. डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या. शेवटी एक वर्षांनंतर समजले की व्हिक्टोरियाला “ऑस्टीओमेलिटीस” नावाचा रोग झाला होता.
काय असतो हा रोग ?
हाडांना इन्फेक्शन झाल्यास त्याला “ऑस्टीओमेलिटीस” म्हटले जाते. व्हिक्टोरियाला हाच रोग झाला होता. तिच्या पायाच्या अंगठ्याचे हाड गळाले होते. डॉक्टरांनी तिला पायाचा अंगठा कापण्याचा सल्ला दिला. अंगठा कापल्यानंतरही तिला जेव्हा आराम मिळाला नाही. शेवटी तिच्या पायाची सगळीच बोटे कापावी लागली.
याबद्दल व्हिक्टोरिया सांगते की, २०१० मध्ये तिने ज्या टॅंक मध्ये पाय सोडून फिश स्पा घेतला होता, त्या पाण्यामध्ये बॅक्टरीया होत्या. त्यामुळे व्हिक्टोरियाच्या पायाला २००६ मध्ये झालेले इन्फेक्शन पुन्हा उद्भवले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.