विश्वचषक २०१९ चा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड संघां दरम्यान पहिली उपांत्य लढत आज मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे. विश्वचषकाच्या लीग स्टेजमध्ये चांगलेच रंगतदार सामने बघायला मिळाले. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी संघामध्ये चांगलीच लढाई झाली.
लीग स्टेजमध्ये भारतीय टीमने अव्वल स्थान पटकावले. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या, इंग्लंडने तिसऱ्या आणि इंग्लंडने चौथ्या स्थानावर कब्जा करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या विश्वचषकात अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर संघाला सर्वोत्तम स्थानावर नेऊन ठेवले आहे. या हंगामात असे तीन खेळाडू आहेत की ज्यांनी कठीण प्रसंगी उत्तम खेळ करत आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिबउल हसनने सर्वात अगोदर ६०० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरने हा टप्पा ओलांडला. सर्वात जास्त धावांच्या बाबतीत आता रोहित आणि वॉर्नरमध्ये स्पर्धा असणार आहे.
विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीपूर्वीच आयसीसीने या विश्वचषकातील चार सुपरस्टारची यादी ट्विटरवर जाहीर केली आहे. या यादीत रोहित शर्मा, मिशेल स्टार्क, जो रुट आणि अॅलेक्स कॅरी यांचा समावेश आहे. सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त विकेट, सर्वात जास्त यष्टीचीत यात सर्वोतकृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा यात समावेश आहे.
रोहित शर्माने या विश्वचषकात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहितने या विश्वचषकात ५ शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित हा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे.
ऑस्ट्रेलियाचा २९ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आयसीसीच्या या यादीतील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत त्यांने एकूण २६ बळी घेतले आहेत. यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टार्कने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सेमीफाइनलमध्ये आणले. तर ऑस्ट्रेलियाचाच यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने यष्टीच्या मागे सर्वाधिक झेल घेतल्या आहेत.
तर इंग्लंडच्या जो रुटने स्पर्धेत आतापर्यंत ११ झेल घेतले असून दोन शतके आणि तीन अर्धशतकांच्या बळावर ५०० धावा देखील केल्या आहेत.
✴️ Most Runs
✴️ Most Wickets
✴️ Most Catches
✴️ Most Dismissals
The Four Superstars of #CWC19 pic.twitter.com/9G3wo94QuN— ICC (@ICC) July 8, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.