१९६९ पासून LGBTQ म्हणजेच लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वेअर या समूहातील लोकांनी आपल्याला स्वतःची ओळख, अधिकार आणि सन्मान मिळावा यासाठी संघर्ष सुरु केला होता. मागच्या महिन्यात त्या समूहाच्या स्वीकृतीला ५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त गुगलने डुडल आणि स्लाईड्स बनवून त्यांचा आजपर्यंतचा प्रवास दाखवला होता.
याबद्दल जगभरातून गुगलचे कौतुक झाले होते. LGBTQ असणे गुन्हा नाही, हा संदेश आता भारताच्याही छोट्या छोट्या शहरात पसरत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे नुकताच वाराणसीत पार पडलेला दोन लेस्बियन बहिणींचा विवाह ! पाहूया काय आहे प्रकरण…
या दोन लेस्बियन बहिणींनी केला विवाह
उत्तरप्रदेशमधील दोन बहिणींना एकमेकींसोबत प्रेम झाले होते. आपल्या प्रेमाला समाजाची मान्यता मिळावी म्हणून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ३ जुलैला दोघीही जीन्स टीशर्ट सोबत लाल चुनरी घालून बनारस मधील मंदिरात पोहोचल्या.
तिथल्या पुजाऱ्याला त्यांनी लग्न लावून देण्याची विनंती केली. ते ऐकून पुजारी आश्चर्यचकितच झाला. मात्र नंतर त्याने पारंपरिक पद्धतीने दोघींचे लग्न लावून दिले. हे लग्न बघण्यासाठी लोकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. लग्नांनंतर दोघी बहिणी कानपूरला निघून गेल्या.
असे जुळले दोघींचे प्रेम प्रकरण
मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी एक युवती कानपूरची आणि दुसरी मुलगी वाराणसीच्या सुंदरपूरची आहे. दोघी मुली नात्याने मावस बहिणी आहेत. कानपूरची बहीण शिक्षणासाठी सुंदरपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या मावशीकडे राहायला आली होती. तिथेच त्या दोन्ही बहिणीमध्ये प्रेमाचे सूर जुळले. त्यांना इतकी प्रेमाची धुंदी चढली की शेवटी दोघींनी लग्न केले. लग्नानंतर दोघींनी आपले फोटो सोशल मीडियावर टाकले. त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
पहा व्हिडीओ :
वाराणसी में एक अनोखा मामला सामने आया, जब दो लड़कियों ने मंदिर में आकर पंडित से कहा कि हम शादी करना चाहते हैं. पंडित ने जब यह बात पूछा कि आपस में तुम क्यों शादी करना चाहती हो तो उनका कहना था कि लड़कों पर अब भरोसा करना बेहद ही मुश्किल है, जिसके लिए हम आपस में शादी करना चाहते हैं pic.twitter.com/Da45XCfT9F
— Ajay Singh (@AjayNDTV) July 4, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.