आपण बघितलं असेल वेळोवेळी सृष्टीचा विनाश होणार असल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. पण सृष्टीचा विनाश व्हायला अजून बराच अवकाश आहे. मात्र भारतातील अनेक मंदिरे आणि गुहा अशा आहेत ज्यांनी अशी अनेक रहस्ये आपल्या पोटात दडवली आहेत.
भारतात अशीच एक गुहा आहे ज्यात सृष्टीच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंतच्या रहस्यांचा उलगडा होतो. या गुहेचा उल्लेख स्कंद पुराणात देखील येत असल्यामुळे तिला धार्मिकदृष्ट्या महत्व आहे.
कुठे आहे ही गुहा ?
भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोलीहाट पासून १६ किमी अंतरावर डोंगररांगांमध्ये ९० फूट अंतरावर स्थित पाताळ भुवनेश्वर या गुहेत अनेक रहस्ये आणि आश्चर्ये सामावली आहेत. समुद्रसपाटीपासून १६५० मीटर उंचीवर असणाऱ्या पाताळ भुवनेश्वरमध्ये केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथचेही दर्शन होते. पुराणात सांगितल्यानुसार येथे चारी धामांचे एकाचवेळी दर्शन होते. गुहेतील एकेका शिल्पावरून सृष्टीच्या निर्मितीपासून अंतापर्यंतच्या प्रवासाचेही ज्ञान मिळते. पाताळ भुवनेश्वर गुहा भगवान शंकराचे निवासस्थान मानली जाते.
काय आहे गुहेतील रहस्य ?
गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ८० पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला युगायुगांचा इतिहास एकाच ठिकाणी असणारे जग बघायला मिळते. भगवान शंकरांनी गणेशाचे धड कापल्यानंतर ते येथे शिलामूर्तीच्या रूपात स्थापित करण्यात आले होते. त्या शिलामूर्तीवर छताला असणाऱ्या १०८ पाकळ्यांच्या ब्रह्मकमळातुन पाण्याचे थेंब पडत असतात. स्वतः भगवान शंकराने हे कमळ स्थापन केल्याची आख्यायिका आहे.
दगड सांगतो कधी होणार सृष्टीचा विनाश ?
पाताळ भुवनेश्वर गुहेत चार दगड आहेत जे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीक मानले जातात. यापैकी तीन दगडांच्या आकारात काही बदल होत नाही. मात्र कलियुगाची प्रतिक मानण्यात आलेल्या दगडाची उंची हळूहळू वाढत असल्याचे मानले जाते. या दगडाच्या वर छताला एक पिंड असून त्याची लांबी ७ कोटी वर्षांत १ इंचाने वाढत असल्याचे पुजाऱ्याचे सांगणे आहे.
ज्यादिवशी कलियुगाची प्रतीक असणारा दगड आणि छताला असणारी पिंड एकमेकांना जोडले जातील, त्यादिवशी कलियुग संपेल आणि पृथ्वीवर महाप्रलय येऊन सृष्टीचा अंत होईल सांगितले जाते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.