भारतीय क्रिकेटचा दादा माणूस सौरव गांगुलीचा आज वाढदिवस. ८ जुलै १९७२ ला कोलकात्यात जन्मलेल्या गांगुलीने भारतीय क्रिकेट विश्वात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. गांगुलीने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवातच लॉर्ड्स सारख्या मैदानावर केली. आणि एवढ्यावरच न थांबता आपल्या पहिल्याच मॅचमध्ये शतक झळकावले.
भारतीय टीमचा एक यशस्वी कर्णधार म्हणून गांगुलीला ओळखले जाते. त्यानेच भारतीयांना विजयाची सवय लावली. उंचच उंच गगनचुंबी षटकार मारत चेंडू मैदानाबाहेर फेकणाऱ्या भारतीय क्रिकेटमधील दादाच्या दादागिरीचे पाच गाजलेले किस्से बघूया खासरेवर..
१. मोहमद युसूफला म्हणाला ‘तू टाइम नोट कर’-
भारत पाकिस्तान सामन्यात मोहम्मद युसुफ बॅटिंग करत असताना जखमी झाला त्याने ड्रिंक ब्रेक घेतला आणि जखमी झाल्यानंतर फिजिओला देखील बोलावले. पण यामुळे भारताचा बॉलिंग करण्याचा वेळ जात होता. जर निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण नसत्या झाल्या तर कर्णधार गांगुलीला दंड लागला असता. त्यामुळे त्याने तिथेच मोहमद युसुफला सुनावले. तो म्हणाला, ‘मी तुझी गोष्ट करत नाहीये मी माझी गोष्ट सांगतोय. तू रेस्ट घे मला काही प्रॉब्लेम नाही तू मुद्दामहून करतोय हे मी नाही म्हणत फक्त तू टाइम नोट कर.’
२. रसेल अरनॉल्डला सुनावले खडे बोल-
श्रीलंकेचा ऑलराऊंडर रसेल अरनॉल्ड फलंदाजी करत होता. कुंबळेच्या ओव्हरमध्ये त्याने धाव घेण्यासाठी प्रयत्न केला पण तो वापस परतला. तेव्हा तो पिचवर पळत असल्याचे द्रविडने हेरले आणि त्याला तशी सूचना केली. ओव्हर संपल्यानंतर गांगुली त्याच्या जवळ आला आणि त्याला पकडून चांगलेच खडे बोल सुनावले. त्यानंतर अंपायर तिथे आले आणि त्यांनी दोघांना रोखले.
३. हरभजन सिंगला टीममध्ये घेण्यासाठी ताकीद-
२००१ मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे सिलेक्शन सुरु होते. त्यावेळी भारताचा कर्णधार गांगुली होता. कोलकात्यात इडन गार्डनला सामना होणार होता. त्यावेळी निवड समिती हरभजन सिंगला घेण्याच्या विचारात नव्हती. पण सौरव गांगुलीला हरभजन टीममध्ये हवा होता. तेव्हा त्याने तिथेच सांगितले कि जोपर्यंत हरभजन टीममध्ये येत नाही तोपर्यंत मी रूमच्या बाहेर जाणार नाही. हरभजनला अखेर घेण्यात आले आणि त्याने पहिल्या इनिंगमध्ये हॅट्रिकसह सात विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ६ विकेट घेतल्या. त्या मॅचमध्ये भज्जीने १३ विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला.
४. गांगुलीने पहिला सामना खेळला तेव्हा ब्रॉड डायपर घालत असेल-
२००७ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारतासमोर ३१७ धावांचे लक्ष होते. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर मैदानात फलंदाजी करत होते. त्यावेळी स्टुअर्ट ब्रॉड गांगुलीला काही तरी अपशब्द बोलला. त्यानंतर गांगुलीने ब्रॉडला चांगलेच खडे बोल सुनावले. त्यावेळी कॉमेंट्री करत असलेल्या सुनील गावसकर आणि हर्षा भोगले यांनी मजा घेताना म्हंटले कि, ‘ सौरव काय म्हणतोय ऐकू तर येत नाहीये पण तो स्टुअर्ट ब्रॉडला सांगत असावा कि जेव्हा मी पहिला मॅच खेळला होता तेव्हा तू डायपर घालत होता.’ त्यानंतर गांगुलीने पुढच्या ओव्हरमध्ये ब्रॉडला एक उत्तुंग षटकार देखील मारला होता.
५. लॉर्ड्सवरचा सर्वात गाजलेला किस्सा-
लॉर्ड्सवर २००२ मध्ये भारताने जिंकलेली नेटवेस्ट ट्रॉफी सौरव गांगुलीच्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय क्षण होते. गांगुलीने विजयानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपले शर्ट काढून ते फिरवले होते. गांगुलीने फ्लिंटॉपचा बदला घेतला होता. अँड्रू फ्लिंटॉप मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा पराभव केल्यानंतर स्टेडियममध्ये शर्ट काढून पळाला होता. दादा तेव्हा संधी मिळाली आणि बदला घेऊन टाकला.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.