महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु झाली आहे. छमछम पुन्हा सुरु झाल्याने कालपासून मोठी टीकेची झोड उठली होती. पण महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आणि छमछम पुन्हा सुरु झाली.
सध्या संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत महाराष्ट्रात डान्स बार सुरु आहेत. दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 2005 साली डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. डान्सबार बंदीमुळे अनेक बारबाला या दुबई आणि बँकॉकला स्थलांतरित झाल्या होत्या. मुंबईत एक काळ असा होता जेव्हा रात्रभर चालू राहायचे आणि बारबालांवर पैश्यांचा पाऊस पडायचा.
त्या दरम्यान तरन्नुम खान नावाच्या एका बारबालेची वेगळीच हवा होती. तरन्नुम ला देशातील सर्वात श्रीमंत बारबाला म्हणून देखील ओळखले जाते. तरन्नुमवर एका रात्रीत ९० लाख रुपये उडवण्यात आले होते. जाणून घेऊया कोण आहे हि तरन्नुम खासरेवर…
दंगलींनी बदलले आयुष्य-
मुंबईच्या अंधेरीमध्ये राहणाऱ्या तरन्नुमचे वडील एक छोटी दुकान चालवायचे. तरन्नुमच्या कुटुंबात तिच्या बहीण भावासह ६ व्यक्ती होते. तिच्या वडिलांच्या उत्पन्नात घरदार चालवणे कठीण असायचे. अत्यंत हलाखीचे जीवन त्यावेळी ते जगत होते. १९९२ मध्ये झालेल्या दंगलींनी तरन्नुमचे घर आणि दुकान लुटले गेले.
त्यामुळे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. त्यांचावर मदतकेंद्रात राहण्याची नामुस्की आली. या दुखत वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं जीवन बेडवर आलं. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तरन्नुमने बारबाला बनण्याचा निर्णय घेतला.
एका रात्रीत ९० लाख रुपये कमाई-
त्यानंतर तरन्नुमने मुंबईच्या दीपा बारमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काम करण्यास सुरु केल्यानंतर थोड्याच दिवसात तरन्नुम फेमस झाली. तिचा डान्स बघण्यासाठी लोकं दुरदुरून यायला लागली. तरन्नुमवर रात्रीत लाखो उडवणारे अनेक जण भेटले.
या लोकांमुळे तरन्नुम मुंबईतील सर्वात श्रीमंत बारबाला बनली. तरन्नुमने वयाच्या १६ व्या वर्षी बारबाला म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तरन्नुमला सर्वात सुंदर बारबाला म्हणून देखील ओळखले जाते. बोलले जाते कि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात नाव आलेला, नुकताच मरण पावलेला अब्दुल करीम तेलगी तिचा मोठा फॅन होता. त्याने एका रात्रीत तरन्नुमवर ९० लाख रुपये उडवले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.