बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र मागच्या अनेक वर्षांपासून सेट मॅक्स चॅनेलवर त्यांचा एकच चित्रपट वारंवार दाखवला जातो, सूर्यवंशम !
आठवड्यातून तीन तीन वेळा येणारा हा चित्रपट पाहून त्यातील डायलॉगसुद्धा आता लोकांच्या तोंडपाठ झाले आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटावर जोक्स, मिम्स बनवून लोकही कंटाळले आहेत, मात्र हा चित्रपट अजून सुरूच आहे.
१९९९ साली सूर्यवंशम रिलीज झाला होता, यंदा त्याला २० वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणकून आपटला होता. मात्र मॅक्स चॅनेलने हा चित्रपट वारंवार दाखवण्याचा चंगच बांधला आहे. पूर्वीचे सेट मॅक्स चॅनेल आता सोनी मॅक्समध्ये बदलले तरी चित्रपट दाखवण्याची त्यांची परंपरा तशीच चालू आहे. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, नेमके कोणत्या कारणामुळे हा चित्रपट भारतीय चॅनेलवर सर्वाधिक वेळा दाखवला गेलेला चित्रपट आहे.
हे आहे कारण
सोनी मॅक्स चॅनेलच्या मार्केटिंग हेड वैशाली शर्मा सांगतात की, एकमात्र मॅक्स चॅनेलनेच सूर्यवंशम चित्रपटाचे १०० वर्षांचे प्रसारणाचे हक्क खरेदी केले आहेत. गेली १९ वर्ष हा चित्रपट दाखवला जात आहे, अजून पुढची ८१ वर्ष हा चित्रपट दाखवला जाणार आहे. मॅक्स चॅनेलचा जन्म आणि हा चित्रपट एकाच वेळी रिलीज म्हणजे १९९९ मध्ये झाला होता.
या चित्रपटातील प्रमुख नायिका सौंदर्या रघु यांचा विमान अपघातात मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी केलेला हा पहिला आणि एकमेव चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आई आणि पत्नीचा आवाज अभिनेत्री रेखा यांचा आहे. दर रविवारी हा चित्रपट मॅक्स चॅनेलवर दाखवला जातो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.