आतापर्यंत शासना मार्फत पायांनी अपंग असलेल्या गरजूंना 3 चाकी सायकली, कुबड्या देण्यात येत होत्या. त्यावरच आपण अपंगांना खूप मोठी मदत करीत आहोत असा आव आणून शासन स्वतःला धन्य मानीत होते. मात्र या पलीकडे विचार करण्याची शासनाची किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीची मानसिकता नव्हती. यामधून मात्र 288 मधील एकच अपक्ष आमदार अपवाद ठरलेत.
चला जाणून घेऊ या कोण आहेत ते आमदार ज्यांनी आतापर्यंतच्या राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी च्या पेक्षा अपंगांसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यात पहिल्यांदा राबविला.
स्वतःच्या आमदार निधीमधून चक्क 10 लाख रुपये खर्च करून 10 अपंग विद्यार्थ्यांना मोपेड ( scooty) गाड्या, शालेय साहित्य अपंगाची साठी खर्च करणारा राज्यातील पहिला आमदार ठरलेत बच्चू कडू.
आमदाराचा वाढदिवस दिवस म्हणजे जंगी पार्टी,डी जे , डान्स, विविध प्रकारचे पेय, व्हेज नॉन व्हेज डिनर व स्वकीय कार्यकर्ते व नातलग… हे सर्व ठरलेलं असते. याला अपवाद फक्त 5 जुलै ला असणारा एका आमदाराचा वाढदिवस
राज्यभरात ठिक ठिकाणी रक्तदान,वृक्षारोपण.शालेय साहित्य गरजूंना मदत अश्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. याच वाढदिवसाच्या औचित्यावर पूर्णामाय अपंग व पुनर्वसन केंद्र टोगलापूर कुरळ फाटा ता चांदूरबाजार येथे अपंग व्यक्ती करिता गरजेचे असणारे सर्व साहित्य जसे कर्णयंत्र,कॅलिबर,अंध काठी, कुबड्या,कुत्रीमं पाय ,सायकली इत्यादी वस्तूचे वाटप व तपासणी शिबिर आयोजित केल्या गेले होते.
याच शिबिरात ज्या विद्यार्थ्यांना पाय नाहीत, परंतु शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये जावे लागते, गाडी विकत घेण्याची घरची परिस्थिती नाही अश्या 10 विद्यार्थ्यांना स्कुटी मोपेड गाड्या व इतर गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
ज्या 10 विद्यार्थ्यांना गाड्या देण्यात आल्यात त्या विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करतांना स्वतःच्या डोळ्यातील अश्रु आवरता आले नाही. या विद्यार्थ्यांच्या भावना ऐकल्यावर अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल साहेब , उपविभागीय अधिकारी संदिप अपार साहेब व उपस्थित सर्वांना अगदी गहीवरून आले होते. आपल्या वाढदिवसाचे आगळे वेगळे रिटर्न गिफ्ट देणारे राज्यातील पाहिले आमदार होते अचलपूर चे बच्चू कडू ज्यांनी राज्यातुन पहिल्यांदा आमदार निधी खर्चून अपंग विद्यार्थ्यांना मोपेड गाड्या उपलब्ध करून दिल्यात.
बघा अपंग बांधवांच्या बोलक्या प्रतिक्रिया-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.