२०१९ वर्ल्ड कपमधील भारत आणि श्रीलंका यांच्यात लीड्स मैदानावर सुरु असणाऱ्या ४४ व्या लीग सामान्य दरम्यान एक हेलिकॉप्टर मैदानावरून गेले. त्या हेलिकॉप्टरवर एक वादग्रस्त बॅनर लावण्यात आला होता. या मैदानावर अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरु असतानाही अशाच प्रकारे हेलिकॉप्टर मधून वादग्रस्त बॅनर फिरवण्यात आला होता.
या घटनेमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या समर्थकांमध्ये जोरदार भांडणही झाले होते. त्यावेळी आयसीसी आणि लीड्स हवाई ट्राफिक कंट्रोलर यांनी सांगितले होते की अशी घटना परत घडणार नाही, मात्र आता परत अशी घटना घडल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेलिकॉप्टरला लावून फिरवलेल्या बॅनरवर भारताबद्दल काय वादग्रस्त मजकूर होता ?
भारत आणि श्रीलंका यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सामना सुरु असताना एक हेलिकॉप्टर मैदानाच्या वर आले. त्याने मैदानाला तीन घिरट्या घातल्या. त्या हेलिकॉप्टरला एक बॅनर लावण्यात आला. त्या बॅनरवर लिहले होते, “India Stop Genocide and Free Kashmir”, म्हणजेच “भारताने नरसंहार थांबवावा आणि काश्मीरला मुक्त करावे !”
हा प्रकार कुणी केला आहे हे अद्याप समजले नाही. मात्र या प्रकारामुळे भारतीय आर्मी विषयी चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा प्रकारचा खोडसाळपणा करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबद्दल चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यादरम्यानही झाला होता असावा प्रकार
यापूर्वी ह्याच मैदानावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यान सामना झाला होता. त्यावेळीही एक हेलिकॉप्टर मैदानावर आले होते. त्या हेलिकॉप्टरलाही वादग्रस्त बॅनर मैदानावर लावण्यात आला होता. त्या बॅनरवर “जस्टीस फॉर बलुचिस्तान” लिहले होते. या प्रकारामुळे सामन्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे समर्थक एकमेकांशी भिडले होते. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. मात्र परत अशी घटना घडल्याने यातून सुरक्षा यंत्रणेने काहीही बोध घेतला नाही असेच आता म्हणावे लागेल.
खेळाडूंची सुरक्षा रामभरोसे
कुठल्याही हेलिकॉप्टर मधू अशा प्रकारे बॅनर लावून मैदानावर फिरवणे याचा काय अर्थ आहे ? अजूनही वर्ल्ड कपमध्ये काही सामने खेळणे बाकी आहे. कुठल्याही वादग्रस्त विषयांकडे अशा प्रकारे लक्ष वेधता येते काय ? उद्या असाच कुठल्या दहशतवाद्यांनी बॅनर ऐवजी स्फोटक गोष्टी असणारे हेलिकॉप्टर मैदानावर आणल्यास काय करणार ? म्हणजे आताच्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंची सुरक्षा रामभरोसे आहे आहे काय ? अशा प्रकारे सोशल मीडियातून लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्हिडीओ पहा :
Plane with a banner having Justice For Kashmir slogan during #INDvSL match. pic.twitter.com/VDGbemtjeU
— Raajeev Chopra (@Raajeev_romi) July 6, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.