भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI दरवर्षी आपल्या खेळाडूंशी करार करत असते. त्यानुसार कराराच्या कालावधीत संबंधित खेळाडूला मानधन दिले जाते. त्यासाठी BCCI ने आपल्या खेळाडूंना ४ श्रेणींमध्ये विभागले आहे. A+, A, B आणि C ! गतवर्षी करण्यात आलेल्या करारानुसार यापैकी A+ श्रेणीत येणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी ७ कोटी रुपये मानधन दिले जात आहे.
A श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी रुपये, B श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी रुपये तर C श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी १ कोटी रुपये मानधन दिले जात आहे. पण आपल्याला माहित आहे का, की BCCI सन्यास घेतलेल्या खेळाडूंना किती पेन्शन देत हे आपल्याला माहित आहे का ?
पेन्शन देण्यास कधी सुरुवात झाली ?
BCCI ने सण २००४ पासून आपल्या निवृत्त क्रिकेट खेळाडूंना पेन्शन द्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी केवळ १७४ पूर्व खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना ५००० रुपये मासिक पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या धोरणात १ टेस्ट मॅच खेळणाऱ्या किंवा ५० टेस्ट मॅच खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये काही फरक करण्यात आला नव्हता. मात्र त्याच खेळाडूंना यात समाविष्ट केले होते, ज्यांनी टेस्ट आणि वनडे असे दोन्ही प्रकारचे सामने खेळले होते. २०१५ मध्ये यात बदल करण्यात आला.
सध्या खेळाडूंना किती पेन्शन दिली जाते ?
BCCI ने ३१ डिसेंबर १९९३ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि २५ किंवा त्याहून अधिक टेस्ट क्रिकेट मॅच खेळलेल्या सर्व खेळाडूंना प्रति महिना ५०००० रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ३१ डिसेंबर १९९३ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि २५ हून कमी टेस्ट क्रिकेट मॅच खेळलेल्या सर्व खेळाडूंना प्रति महिना ३७५०० रुपये पेन्शन मिळत आहे.
१ जानेवारी १९९४ किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या खेळाडूंना प्रति महिना २२५०० रुपये पेन्शन मिळत आहे. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना दर महिना १५००० पेन्शन दिली जाते.
अंपायर, प्रथमश्रेणी क्रिकेटर, महिला क्रिकेटरांनाही पेन्शन
खेळाडूंसोबतच अंपायरलाही BCCI पेन्शन देत आहे. सेवानिवृत्त टेस्ट क्रिकेट अम्पायरला प्रति महिना २२५०० रुपये पेन्शन दिली जाते तर वनडे क्रिकेट अम्पायरला दरमहा १५००० रुपये पेन्शन दिली जाते. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या ज्या खेळाडूंनी सॅन २००३-०४ च्या सिझन पर्यंत २५ ते ४९ टेस्ट खेळले असतील, त्या सर्व खेळाडूंनाही प्रति महिना १५००० रुपये;
५० ते ७४ सामने खेळणाऱ्यांना २२५०० रुपये आणि ७५ हुन अधिक सामने खेळणाऱ्यांना ३०००० रुपये मासिक पेन्शन दिली जाते. महिला क्रिकेटरांमध्ये ५ ते ९ टेस्ट मॅच खेळल्यास १५००० तर १० हुन अधिक टेस्ट मॅच खेळल्यास २२५०० रूपये पेन्शन दिली जाते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.