भारत सध्या विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. भारताला विश्वचषकात फक्त इंग्लंडविरुद्ध पराभवाचे तोंड बघावे लागले. या सामन्यात देखील भारताने चांगली सुरुवात केली होती पण शेवट चांगला करता आला नाही. इंग्लंडविरुद्ध महेंद्रसिंग धोनीने संथ खेळी खेळली होती. त्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उडाली होती.
त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या देखील बातम्या आल्या. धोनी विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. सुरू असलेल्या विश्वचषकात धोनी आपला शेवटचा सामना खेळेल, असे वृत्त पीटीआयने एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. मागील वर्षभरात धोनीला आपल्या लौकिकाला साजेशी खेळी खेळता आली नाहीये.
बेस्ट फिनिशर ओळख असलेला धोनी अनेक सामन्यांमध्ये फिनिश करू शकला नाहीये. धोनीला स्पिनरविरुद्ध खेळताना देखील अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. त्यामुळे धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
धोनीने दिले निवृत्तीचे संकेत-
धोनीने आपल्या निवृत्तीविषयी हिंट दिल्याचे बोलले जात आहे. धोनी त्या सर्वांचे आभार सध्या मानत आहे ज्यांनी त्याला अडचणीच्या काळात साथ दिली होती. मागील काही सामन्यांमध्ये धोनी वेगवेगळ्या बॅट घेऊन खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे धोनीच्या बॅटवर असलेले स्टिकर देखील वेगवेगळे आहेत.
इंग्लंडविरुद्ध धोनी जेव्हा फलंदाजी करण्यास आला तेव्हा त्याच्या बॅटला SG कंपनीचे स्टिकर होते. त्याने फलंदाजी करताना आपली बॅट बदलली. त्यावेळी त्याच्या बॅटला BAS चे स्टिकर लागलेले होते जे व्हॅम्पायर कंपनीचे आहे. हि कंपनी धोनीसोबत २००४ च्या अगोदर पासून जोडलेली आहे. धोनीने त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू देखील केला नव्हता.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या बॅटला SUNRIDGES चे स्टिकर लागलेले होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धोनी या एकही कंपनीकडून त्यांच्या बॅट वापरण्याचे पैसे घेत नाहीये. कंपन्यांनी देखील धोनीसोबत कोणतीही डील केलेली नाहीये.
याविषयी SG कंपनीने देखील सांगितले आहे कि धोनीसोबत आमची कोणतीही डील झालेली नाहीये. तर धोनीचे मॅनेजर अरुण पांडेय यांनी सांगितले कि, ‘ हे खरे आहे कि धोनी वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट वापरत आहे. पण त्यासाठी तो पैसे घेत नाहीये. धोनी त्याच्या संकटाच्या काळात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. BAS त्याच्यासोबत सुरुवातीच्या काळापासून जोडलेला आहे तर SG ने देखील त्याला खूप साथ दिली आहे.’
साधारणतः ए लिस्ट क्रिकेटर आपल्या बॅटला स्टिकर लावण्याचे ४-५ कोटी रुपये घेतात. सोबत शतक ठोकल्यानंतर आणि मॅन ऑफ द मॅचनंतर बोनस पण घेतात. प्रत्येक स्पर्धेवर हा रेट वेगवेगळा असतो. पण धोनी अशी कुठलीही डील न करता या कंपन्यांचे आभार मानण्याकरिता त्यांचे बॅट वापरत असल्याने हे धोनीच्या निवृत्तीचे संकेत तर नाहीयेत ना अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.