सण १८९४ मधील घटना ! मुंबईतील दोन युवा वकील ! एकाने दक्षिण आफ्रिकेत खळबळ माजवली तर दुसऱ्याने पूर्व आफ्रिकेतील झांजीबार येथे खळबळ माजवली. दोघांचे विचार आणि तत्व एकच होती. वकिली पेशात असत्याला ठार देणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या रस्त्यांवर खळबळ माजवली होती ती बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांनी तर पूर्व आफ्रिकेच्या झांजीबारमध्ये हालचाली करणारे व्यक्तिमत्व होते आर्देशिर गोदरेज ! त्यांनी स्थापन केलेल्या गोदरेज समूहात सध्या कलहाच्या बातम्या आहेत.
असा सुरु झाला गोदरेजचा प्रवास ?
आर्देशिर गोदरेज आपला वकिली पेशा सोडून १८९४ मध्ये मुंबईला आले. तिथे त्यांना एका औषधांच्या कंपनीत केमिस्टचे सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. नोकरी करता करता त्यांना सर्जरी करण्याचे ब्लेड आणि कात्री बनवण्याच्या व्यवसायाची कल्पना सुचली. त्याआधी अशा वस्तू ब्रिटिश कंपन्या बनवत होत्या. गोदरेज यांनी ही संधी साधली. पारशी समाजातील धनसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या मेरवानजी मुचेरजी कामा यांच्याकडून ३००० रुपयांचे कर्ज घेऊन शस्त्रक्रियेची साधने बनवायला सुरुवात केली.
मेड इन इंडिया लिहण्यासाठी इंग्रजांशी भिडले गोदरेज
एका ब्रिटिश कंपनीसोबत करार करून गोदरेज यांनी शस्त्रक्रियेच्या साधनांचे उत्पादन सुरु केले. मात्र लवकरच त्यांना त्या कामात अपयश आले. कारण या वस्तू विक्रीची जबाबदारी ज्या ब्रिटिश कंपनीवर होती त्यांनी गोदरेज यांनी बनवलेल्या वस्तू विकण्यास नकार दिला. कारण होते देशाच्या नावाचे !
गोदरेज यांचे म्हणणे होते की ते आपल्या प्रोडक्टसवर “मेड इन इंडिया” लिहणार, परंतु ब्रिटिश यासाठी तयार नव्हते. ब्रिटिशांना वाटत होते की असे केल्यास प्रोडक्टस विकले जाणार नाहीत. दोघेही आपापल्या मुद्द्यांवर असून राहिल्याने शेवटी त्यांच्यातील करार तुटला आणि गोदरेज यांचा व्यवसायही बंद पडला.
असे पालटले गोदरेज यांचे नशीब
आपला पहिला व्यवसाय बंद पडल्याने एकदा निराश होऊन बसलेल्या गोदरेज यांची नजर पेपरमधल्या बातमीवर पडली. “सर्वांनी आपापल्या घर आणि ऑफिसची सुरक्षा मजबूत करावी.” गोदरेज यांना यातही नव्या व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी १८९७ मध्ये परत एकदा मेरवानजी मुचेरजी कामा यांच्याकडून कर्ज घेऊन कुलूप बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. Anchor नावाच्या ब्रॅण्डने त्यांची कुलपे बाजारात आली. त्यांनी पहिल्यांदा गॅरंटी लेटर सहित कुलपे विकल्याने त्यांच्या कुलुपांची विक्री चांगली झाली. गोदरेज आणि ग्राहक असे नटे निर्माण झाले.
गोदरेज अँड बॉयस कंपनीची स्थापना
कुलुपांच्या व्यवसायाने आत्मविश्वास आल्यानंतर गोदरेज यांनी नवनवे व्यवसाय शोधायला सुरुवात केली. १९०२ मध्ये त्यांनी कपाटं बनवायला सुरुवात केली, त्यांची कपाटं घरोघरी घेतली जाऊ लागली. १९०६ मध्ये बाळ गंगाधर टिळकांना भेटल्यावर गोदरेज यांनी स्वदेशीचा सिद्धांत स्वीकारला. १९१० मध्ये मेरवानजी कामा यांच्या सांगण्यावरून त्यांचा पुतण्या बॉयस याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये त्यांनी “गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग” कम्पनी सुरु केली. बॉयस यांनी नंतर कंपनी सोडली. गोदरेज यांनी मात्र कंपनीचे नाव तेच ठेवले. आजघडीला या कंपनीकडे मुंबईत ३४०० एकर हुन अधिक जमीन आहे.
नव्या दिशा नवे व्यवसाय
गोदरेज यांना लोकांसोबत जोडले जायचे होते. त्यासाठी त्यांनी साबण निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी साबणांमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला जायचा, यामुळे हिंदू व्यथित होते. १९१८ मध्ये गोदरेज यांनी जनावरांच्या चरबी ऐवजी वनस्पती तेलापासून साबण निर्मिती करायला सुरुवात केली.
छवी हा त्यांचा पहिला साबण ! १९१९ मध्ये दुसरा साबण आणला “गोदरेज नंबर २” ! १९२२ मध्ये “गोदरेज नंबर १” साबण आणला ! त्यांचा हा साबण इतका यशस्वी झाला की आपला कुलूप आणि कपाटांचा व्यवसाय भावाला देऊन ते साबण व्यवसायात रमले. भारतरत्न रवींद्रनाथ टागोरांना त्यांनी साबणाचे ब्रँड अँबेसिडर बनवले. आजघडीला गोदरेजचे २० प्रकारचे विविध व्यवसाय जगातील ५० हुन अधिक देशांत पसरले आहेत.
गोदरेजमध्ये वाद
गांधींच्या जवळचे आर्देशिर गोदरेज यांनी १९२८ मध्ये आपला व्यवसाय भाऊ फिरोजशाकडे सोपवला आणि ते नाशिकला निघून गेले. १९३६ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीचेही अगोदरच निधन झाले होते. त्यांना मुलबाळ नव्हते. फिरोजशा यांना चार मुले होती; सोहराब, दोसा, बुरजोर आणि नवल ! त्यात बुरजोर आणि नवल या दोघांचाच वंश पुढे चालला.
बुरजोर यांना आदि और नादिर हि दोन मुले तर नवल यांना जमशेद हा मुलगा आणि स्मिता ही मुलगी झाली. सध्या या भावंडांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाले आहेत. भविष्यात त्यांच्यात कशा वाटण्या होतील सांगता येत नाही !
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.