बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान सर्वात प्रसिद्ध स्टारकिड्स पैकी एक आहे. आजकाल दररोज वेगवगेळ्या बातम्यांमुळे चर्चेत ती असते. मागच्या काही काळामध्ये अशीही चर्चा होती की, ती लवकरात लवकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. पण अद्याप याबद्दल काही स्पष्ट होऊ शकले नाही. आता सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल ना करेल, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वीच तिच्याकडे चांगलाच स्टारडम आहे.
सोशल मीडियावर तिच्याकडे चांगलाच फॅन फॉलोवर वर्ग आहे, जो उत्कंठतेने सुहानाच्या फोटो आणि व्हिडिओंची वाट बघत असतो. नुकताच आलेला सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. फॅन्सला सुहानाचा हा डान्स व्हिडी खूपच आवडला असून लोक हा व्हिडीओ चांगलाच शेअरही करत आहेत.
काय आहे या व्हिडिओत ?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सुहाना खान पोल डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ कुठल्यातरी क्लबमध्ये शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेली दिसत आहे. सुहनाने आपला हा व्हिडीओ सोशल मीडियावर “सुहाना खान डान्स विद हर फ्रेंड्स” अशा कॅप्शनसहित किस आणि हर्टच्या इमोजी सोबत शेअर केला आहे.
या व्हिडिओत सुहाना खान सोबत एक मुलगाही दिसत आहे, जो सुहानाला डांसमध्ये साथ देत आहे. शाहरुखला जेव्हा विचारण्यात येते की सुहाना बॉलिवूडमध्ये कधी डेब्यू करत आहे, यावर शाहरुखचे उत्तर असते की, “त्याच्या मुलीला तिचे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. सध्या ती आपले शिक्षण पूर्ण करत आहे.”
पाहूया हा व्हिडीओ :
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.