आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारताने बांगलादेशला चांगली मात देत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. पण मनोरंजनाची बाब अशी की चहाच्या दुकानांपासून सोशल मीडियापर्यंत मॅच पेक्षा जास्त चर्चा मैदानावर मॅच बघण्यासाठी आलेल्या ८७ वर्षांच्या क्रिकेट फॅन बद्दलच आहे.
चारुलता पटेल असे या ८७ वर्षीय क्रिकेट फॅनचे नाव आहे. त्या व्हीलचेअरवर बसून भारत आणि बांगलादेशची मॅच बघण्यासाठी आल्या होत्या. मॅच दरम्यान त्यांनी ना केवळ टीम इंडीयाला प्रोत्साहन दिले, सोबतच भारताच्या विजयासाठी जोशात घोषणाही दिल्या. त्यांनी वुवुजेला हे वाद्यही वाजवले. चारुलता पटेल यांच्या या भावनेला आणि क्रिकेट प्रेमाला सर्वजण सलाम करत आहेत. मैदानावरील भारतीय समर्थकही त्यांचा या वयातील जोश पाहून साथ देत होते.
मॅच झाल्यानंतर कर्णधार कोहली आणि रोहित शर्माने चारुलता पटेल यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले होते. चारुलता या मॅचनंतर रातोरात स्टार झाल्या होत्या. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले होते. त्यांच्या या प्रसिद्धीचा फायदा त्यांना होताना दिसत आहे.
मॅचदरम्यानच आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून चारुलता यांच्यासाठी भारताच्या सर्व सामन्यांचे तिकीट बुक करू असे सांगितले होते. त्यानंतर आता चारुलता यांना जाहिरात देखील मिळाली आहे. चारुलता यांना पेप्सिकोने आपल्या एका कॅम्पेनसोबत जोडले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार लवकरच चारुलता या आपल्याला पेप्सिकोच्या जाहिरातीत दिसणार आहेत.
पेप्सीकोने त्यांना या विश्वचषकातील ‘स्वैग स्टार’ चा नवीन चेहरा म्हणून निवडले आहे. चारुलता यांच्या या जाहिरातीचे शूटिंग देखील याच आठवड्यात सुरु देखील झालं आहे. लवकरच आपल्याला हि ऍड बघायला देखील मिळू शकणार आहे.
पेप्सीकोकडून चारुलता यांना मिळालेली रक्कम लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे. नेमकं किती पैसे त्यांचे ठरले याचा आकडा नसला तरी चारुलता यांना मोठी रक्कम मिळाल्याची शक्यता आहे. चारुलता यांना सेमीफायनल आणि फायनल बघण्यासाठी तिकीट देण्याची जबाबदारी विराट कोहलीने अगोदरच घेतली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.