लोकांच्या वार्षिक उत्पन्नावर ठरतं की कोण मध्यमवर्गीय आहे आणि कोण गरीब ! सगळ्यात आधी येतात मध्यमवर्गीय, त्यानंतर येतात निम्न मध्यमवर्गीय आणि सर्वात शेवटी येतात ते लोक ज्यांच्या घरी फकीर आणि फक्त रविवारच्या दिवशीच नॉनव्हेज बनवले जाते. पण इथे आपण फक्त लोकांच्या सवयींवरून ते ठरवू शकतो.
असे कित्येक लोक आहेत, ज्यांची जीवनशैली बघून सांगू शकतो की हा भाऊ पक्का मध्यमवर्गीय आहे. त्यासाठी एक यादी बनवली आहे, ज्यातील सगळ्या गोष्टी मध्यमवर्गीयांच्या घरी हमखास होतात.
पाहूया मध्यमवर्गीय लोकांच्या १० हमखास आढळणाऱ्या सवयी :
१) जेव्हा घरी कुणी पैसे मागायला येतात, तेव्हा लहान मुलांना पाठवून त्यांच्याजवळ “घरात कुणी नाही” असा निरोप दिला जातो. २) बिछान्याच्या खाली चांगल्या चांगल्या प्लॅस्टिक पिशव्या जमा करून ठेवल्या जातात.
३) एका ग्लास दुधात दोन कप चहा बनवून सुद्धा मुलांसाठी दूध शिल्लक ठेवले जाते. ४) जेव्हा पाणी जास्त गरम करायचे असते तेव्हा गॅस वापरण्या ऐवजी चुलीवर पाणी गरम केले जाते.
५) मुलाला नोकरी लागावी म्हणून नवस केला जातो. ६) सकाळच्या वेळी नाश्ता शिल्लक राहिला तर संध्याकाळी तो गरम करून खाल्ला जातो. ७) पाऊस सुरु झाला की लगेच टीव्ही बंद केला जातो.
८) सणासुदीच्या वेळी वडील सर्वांसाठी नवीन कपडे घेऊन येतात, मात्र स्वतः जुन्या सदऱ्याला इस्त्री करून काम भागवतात. ९) शेजाऱ्याला कधीही रिकामे भांडे परत करत नाहीत. १०) कार्यक्रमात अन्न शिल्लक राहिले तर शेजाऱ्यांमध्ये वाटतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.