१ जुलै पासून अमरनाथ यात्रा सुरु झाली आहे. बर्फानी बाबांचे भक्त त्यांच्या दर्शनासाठी निघाले आहेत. अमरनाथ श्राइन बोर्डाकडून या यात्रेचे संपूर्ण नियोजन केले जाते. भाविकांचा पहिला समूह अमरनाथला रवाना झाला आहे. अमरनाथ हे हिंदूंचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. यंदा १ जुलै पासून १५ ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार आहे.
काश्मीरच्या बर्फाळ भागात स्थित असणारी अमरनाथ गुहा १६० फूट लांब आणि १०० फूट रुंद आहे. याच गुहेत अमरनाथ मंदिर आहे. या मंदिरात नैसर्गिकरित्या बर्फापासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते. या अमरनाथ गुहेच्या ५ अशा रहस्यांबद्दल आपण बघणार आहोत ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही.
१) मानले जाते की, भगवान शंकराने पार्वती मातेला अमरनाथच्या गुहेतच अमर होण्याचा मंत्र सांगितला होता. हिंदू धर्मशास्त्रानुसार कुणालाही अमरकथा ऐकण्याची परवानगी नव्हती. त्यासाठी भगवान शंकरांनी पार्वती मातेला ही कथा ऐकवण्यापूर्वी सर्वांना सोडून इथे आणले होते. अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास ९६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पहलगाम येथे त्यांनी आपले वाहन नंदीला सोडले होते. त्यानंतर पुढे शेषनाग तलावावर त्यांनी आपल्या गळ्यातील नाग उतरवून ठेवला होता. पुत्र गणेशाला त्यांनी महागुणस पर्वतावर सोडले होते. त्यांनतर पंचतरणी इथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाच तत्वांचाही त्याग केला होता.
२) मानले जाते की भगवान शंकरांनी गुहेत जेव्हा पार्वती मातेला अमर होण्याचा मंत्र सांगितला होता, तेव्हा गुहेत त्या दोघांव्यतिरिक्त फक्त एक कबुतरांची जोडी उपस्थित होती. कथा ऐकल्यानांतर कबुतरांची जोडी अमर झाली. आजसुद्धा अमरनाथ गुहेत त्या कबुतरांची जोडी दिसत असल्याचे सांगितले जाते.
३) अमरनाथ गुहा चारी बाजूंनी कच्च्या बर्फाने झाकलेली असते, पण गुहेतील शिवलिंग पक्क्या बर्फाने बनलेले असते. हे शिवलिंग अशा प्रकारे पक्क्या बर्फाने कसे बनते हे आजसुद्धा एक रहस्य आहे.
४) मानले जाते की, बुटा नावाचा मुस्लिम व्यक्ती आपल्या बकऱ्या चारण्यासाठी या जागेवर आला असताना त्याला एक साधू भेटला. त्या साधूने बुटाला एक कोळशाने भरलेली पिशवी दिली. बुटाने घरी येऊन पिशवी उघडून बघितल्यावर त्याला त्यात कोळशाऐवजी सोन्याची नाणी आढळली. बुटा हैराण झाला आणि त्या साधूला धन्यवाद देण्यासाठी तो परत त्या जागेवर गेला. तिथे त्याला साधूऐवजी गुहा दिसली. तेव्हाच अमरनाथ गुहेचा शोध लागला आणि ते तीर्थक्षेत्रात बदलले.
५) असे मानले जाते की, अमरनाथ गुहा ५००० वर्ष जुनी आहे. या गुहेतील शिवलिंग स्वयंभू मानले जाते, कारण या शिवलिंगाची निर्मिती नैसर्गिकरित्या होते. अमरनाथ गुहेत शिवलिंगाजवळ पाणी वाहते. पण ते पाणी कुठून येते याचा आतापर्यंत शोध लागला नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.