आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारताने बांगलादेशला चांगली मात देत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. पण मनोरंजनाची बाब अशी की चहाच्या दुकानांपासून सोशल मीडियापर्यंत मॅच पेक्षा जास्त चर्चा मैदानावर मॅच बघण्यासाठी आलेल्या ८७ वर्षांच्या क्रिकेट फॅन बद्दलच आहे. लोक त्यांच्या भारतीय संघावरील उत्कट प्रेमाचे कौतुक करत आहेत. एवढेच नाही तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या ८७ वर्षांच्या क्रिकेट फॅनच्या बाबतीत मोठी घोषणा केली आहे.
कोण आहे या ८७ वर्षांच्या क्रिकेट फॅन ?
चारुलता पटेल असे या ८७ वर्षीय क्रिकेट फांचे नाव आहे. त्या व्हीलचेअरवर बसून भारत आणि बांगलादेशची मॅच बघण्यासाठी आल्या होत्या. मॅच दरम्यान त्यांनी ना केवळ टीम इंडीयाला प्रोत्साहन दिले, सोबतच भारताच्या विजयासाठी जोशात घोषणाही दिल्या. त्यांनी वुवुजेला हे वाद्यही वाजवले. चारुलता पटेल यांच्या या भावनेला आणि क्रिकेट प्रेमाला सर्वजण सलाम करत आहेत. मैदानावरील भारतीय समर्थकही त्यांचा या वयातील जोश पाहून साथ देत होते.
विराट कोहली आणि रोहित शर्माही जाऊन भेटले
भारताची बॅटिंग सुरु असताना चारुलता पटेल वुवुजेला वाजवत होत्या ते बघून कॉमेंटेटर सुद्धा हैराण झाले. हर्षा भोगलेने सांगितले की, हे इतके सुंदर दृश्य आहे आणि अशा फॅन्समुळेच क्रिकेट खेळ अजूनच रोमांचक बनला आहे.
मॅच संपल्यानंतर भारतीय कॅप्टन विराट कोहली आणि व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा चारुलता पटेल यांना भेटले आणि त्यांचा आशीर्वादही घेतला. चारुलता पटेल यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, “जेव्हापासून मी आफ्रिकेत होते, तेव्हापासून क्रिकेट बघत आहे. घरात काम करताना टीव्हीवर बघायची आणि आता रिटायर झाल्यानंतर लाईव्ह बघत आहे.”
आनंद महिंद्रांनी चारुलता पटेलांसाठी केली ही घोषणा
मॅच सुरु असताना आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर पोस्ट टाकली की, “मी मॅच बघत नव्हतो पण या महिलेसाठी मी टीव्ही सुरु केला. ती एका विजेत्याप्रमाणे दिसत होती.” त्यांनतर त्यांनी एका युजरच्या कमेंटला उत्तर देताना सांगितले की, “या महिलेबद्दल माहिती काढा, मी वाचन देतो की भारताचे पुढचे जितके सामने असतील त्यासाठी मी या महिलेचे तिकीट खरेदी करेन…”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.