हाताने जेवणे ही आपली भारतीय संस्कृती. पण आपल्याकडे इंग्रजांचे राज्य आले आणि त्यांनी असे काही केले की आपल्यालाच आपल्या संस्कृतीचा लाज वाटू लागली. दीडशे वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांचा आपल्या वरील प्रभाव इतका कायम आहे की आपल्याला अजूनही आपण त्यांची संस्कृती फॉलो करतो.
सहसा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर हातांऐवजी चमच्याने खाणे पसंत करतो. बऱ्याचदा हॉटेलमध्ये हाताने खाण्याची लाज देखील वाटते. हॉटेल व्यतिरीक्त अनेक ठिकाणीही तुम्ही चमचा, काट्याने जेवण करत असाल. पण हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असते. हाताने जेवताना आपले सारे लक्ष इतर कुठेही न जाता केवळ खाण्यावर केंद्रित होते.
तुम्हाला माहित आहेत का हाताने जेवण्याचे फायदे ? चला तर मग जाणून घ्या हातांनी जेवण्याचे फायदे-
जाड होण्यापासून बचाव होतो
हातांनी जेवल्यास कमी जेवणात लवकर पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे जाड होण्यापासून बचाव होतो.
चांगले पचन होते
हातांना असणारा गुड बॅक्टरीया पोटात गेल्यास पचनासाठी मदत करतो. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.
जेवणाला जास्त चव येते
हातांनी जेवल्यास तोंडातील लाळ आणि स्वाद ग्रंथी चांगल्या प्रकारे कार्यरत होतात. त्यामुळे जेवणाला चांगली चव येते.
अति आहारापासून बचाव होतो
हातांच्या संपर्कात आल्याने अन्नाच्या बाबतीत मेंदूला सूचना मिळत राहतात. यामुळे अति आहारापासून बचाव होतो.
मल्टीटास्किंग पासून बचाव होतो
चमचा किंवा इतर कटलरीने जेवण लवकर होते, त्यामुळे शरीरातील साखरेचा समतोल बिघडतो. हातांनी जेवल्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.
पंचतत्वांशी जोडणी होते
आयुर्वेदानुसार पाच बोटे पंचतत्वांचे प्रतीक असतात. त्यामुळे हातांनी जेवल्याने आपण पंचतत्वांशी जोडले जातो.
जेवणावर लक्ष लागते
हातांच्या स्पर्शामुळे मेंदूद्वारे पोट आणि तोंडाला समजते की अन्न त्यांच्यापर्यंत येत आहे. यामुळे पाचक रस कार्यरत होतो.
प्रतिकारशक्ती वाढते
हातांना असणारा गुड बॅक्टरीया पोटात गेल्यामुळे शरीराची रोगांविरोधात लढण्याची क्षमता वाढते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.