दिवसेंदिवस टिकटॉक बद्दल लोकांना असणारी उत्सुकता वाढतच चालली आहे. टिकटॉक आल्यामुळे कित्येक लोकांना रोजगाराचे नवीन पर्याय मिळाले, तर कित्येकांचा जीवही गेला. कित्येकांना प्रसिद्धी मिळाली तर कित्येकांना ओळख मिळाली.
एकंदर टिकटॉक आल्यामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेले. सध्या टिकटॉकची ताजी घटना तामिळनाडू मधून समोर आली आहे. बातमीनुसार टिकटॉक मुळे ३ वर्षांपूर्वी बिछडलेले एक जोडपे परत एकत्र आले आहे. पाहूया टिकटॉकमुळे कसा लागला हरवलेल्या पतीचा शोध…
सांगितले जाते की २०१६ मध्ये सुरेश नावाचा एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि दोन मुलांना सोडून कुठेतरी निघून गेला होता. त्यांनतर त्याची पत्नी जया आपल्या पतीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांकडे गेली, पण तिच्या पतीचा काहीच पत्ता लागला नाही. दुसरीकडे नुकतेच जयाच्या एका नातेवाईकाने टिकटॉकवर एका तृतीयपंथी सोबत सुरेशचा व्हिडीओ बघितला. हा व्हिडीओ त्याने जयाला दाखवला. तो व्हिडीओ बघताच जयाने ओळखले की व्हिडिओतील व्यक्ती आपला पतीच आहे.
जयाने आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी नवी दिशा सापडली. तिने तात्काळ विल्लूपुरम पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी सुरेशचा शोध सुरु केला. लवकरच त्यांना सुरेशचा पत्ता सापडला आणि त्यांनी त्याला शोधून घरी आणले. त्याची विचारपूस केल्यानंतर समजले की सुरेश काही गोष्टींमुळे नाराज होऊन घर सोडून निघून गेला होता. घरापासून दूर राहून तो होसूर याठिकाणी एका ट्रॅक्टर कंपनीत मॅकेनिक म्हणून काम करायला लागला.
जवळपास तीन वर्ष पोलिसांनी सुरेशचा शोध घेतला. जयानेही शोध घेऊन आता आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली होती. पण टिकटॉक बाबांमुळे जयाला तिचा पती परत मिळाला. सध्या सुरेश आणि जया यांच्याशी सल्लामसलत करून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. जय हो टिकटॉक बाबा की !
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.