भारताने काल बांगलादेशचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाने आतापर्यंत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून अजून दोन संघ आजच्या न्यूझीलंड आणि इंग्लंड सामन्यानंतर जवळपास निश्चित होतील. भारतीय संघाने विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे.
भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयसीसीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारताचा विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी याने घेतलेला कॅच आणि पाकिस्तानचा कर्णधार विकेटकिपर सरफराज यांनी घेतलेल्या कॅचची तुलना केली आहे.
दोघांनीही डाइव्ह मारून उत्कृष्ट कॅच घेतली आहे. आयसीसीने तुलना करताना विचारले आहे कि कोणाचा कॅच चांगला आहे. महेंद्रसिंग धोनीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात डाइव्ह मारून कार्लोस ब्रेथवेटचा एका हाताने हा उत्कृष्ट कॅच घेतला होता.
तर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रॉस टेलरचा डाइव्ह मारून एका हाताने उत्कृष्ट कॅच घेतला होता.
बघा व्हिडीओ आणि सांगा कोणी घेतला बेस्ट कॅच-
Dive and conquer, who did it better?#CWC19 pic.twitter.com/5Ln2DjgalG
— ICC (@ICC) June 27, 2019
आयसीसीने अशी तुलना करणारी पोस्ट केल्यानंतर लोकांनी आयसीसीला ट्रोल केले आहे. लोकांनी सांगितले कि सरफराजची कॅच चांगली आहे पण त्याच्यासोबत महान धोनीची तुलना होऊ शकत नाही. धोनी फिटनेसच्या बाबतीत सरफराजच्या खूप पुढे आहे. तर काहींनी म्हंटले आहे कि अशी पोस्ट टाकून आयसीसीने भांडण लावण्याचे काम केले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.