जगात वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ असतात. त्यातून स्वादासोबतच आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर गरजाही पूर्ण होतात. पण माणसाच्या जिभेचे चोचले काय संपत नाहीत. कधी मजबुरी म्हणून, कधी शौक म्हणून तर कधी रोमांच म्हणून माणूस काहीही करायला तयार असतो. जसे या अजबगजब डिशेसच घ्या ना ! तुम्हाला विश्वास नाही बसणार, की माणूस या सगळ्या गोष्टी खाऊ शकतो. पाहूया असेच सहा प्रकारचे पदार्थ…
१) जिवंत आणि उड्या मारणारे जेवण –
Oysters आणि Sea Urchin जिवंतच कळले जातात. तुमच्या समोर प्लेटमध्ये असं काही जेवण वाढले जाते, जे तुम्हाला खायचं तर असतं पण ते जेवण स्वतः आपला जीव वाचवण्यासाठी पळून जायचा प्रयत्न करत असते. जपानी पाक विधी Ikizukuri नुसार समुद्रातील जीव न शिजवता खायचे असते. त्यात मासे, ऑक्टोपसला मीठमसाला लावून ताटात वाढले जाते. जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात या पाककलेवर बंदी आहे. व्हिएतनाममध्ये कोब्राचे धडधडणारे हृदयही खातात. व्हिएतनामी लोक ते व्होडका शॉट्स सोबत खाणे पसंत करतात.
२) सडलेले जेवण –
युरोप आणि अमेरिकेच्या काही भागात सडलेले मासे खाणे जरा जास्तच पसंत केले जाते. यासाठी Salmon माशाची मुंडकी काही दिवस जमिनीत पुरून ठेवतात आणि सडल्यानंतर ती बाहेर काढून खाल्ली जातात. आइसलँडमध्येही अशा प्रकारचे मासे खाल्ले जातात. त्यासाठी ते Greenland Shark चा वापर करतात. शार्कचे ताजे मांस विषारी असते, म्हणून ते खाण्यापूर्वी १२ आठवडे जमिनीखाली ठेवले जाते.
३) बुरशी लागलेले जेवण –
आपण सहसा बुरशी लागलेले अन्न फेकून देत असतो, पण बुरशी बघूनच काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. आपल्याला माहित आहे अनेक प्रकारचे चीज असतात जे बुरशीच्या मदतीने बनवले जातात. पण Casu Marzu चीज बद्दल आपल्याला माहित नाही, आरोग्याच्या कारणांमुळे युरोपमध्ये ते बॅन आहे. तसेच मेक्सिकन स्टाईलचा भुट्टा बुरशी लागल्यावर खाल्ला जातो, त्याला Huitlacoche म्हणतात. बुरशी लागल्यावर त्याचे दाणे निळे दिसतात.
४) प्राण्याचे जेवण –
काही प्राण्यांचे मांस खायला स्वादिष्ट असते, काहींचे पौष्टिक असते तर काहींचे खायलाच बंदी असते. जगातल्या अनेक ठिकाणी खाण्यात मांजर, कुत्रे आणि ससे असतात. वटवाघुळाच्या सूपमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्याला खूप दुर्गंधी असते. थायलंडमध्ये जिवंत वटवाघळे उकळून त्यात मसाला टाकून त्यांची पेस्ट बनवली जाते.
अनेक ठिकाणी उंदराची तीन दिवसांच्या आतली आणि डोळे न उघडलेली नवजात पिल्ले अस्थमाच्या इलाजासाठी दारूत बुडवून खाल्ली जातात. व्हेल माशाचे मांस विषारी असते. त्यात पाऱ्याचा अंश असतो. ग्रीनलंडमध्ये व्हेल त्वचा आणि आतड्या खाल्ल्या जातात.
५) प्राण्यांच्या शरीराचे विचित्र भाग –
जगाच्या अनेक भागात संडाचे लिंग आवडीने खाल्ले जाते. त्याला ग्रील करून किंवा फ्राय करून किंवा त्याचे सूप बनवून खाल्ले जाते. असं मानलं जाते की त्यामुळे लैंगिक टाकत वाढते. त्याबरोबरच बैल आणि याकचे लिंगही खाल्ले जाते. याशिवाय उत्तर अमेरिकेत हरणाचे नाक उकळून त्याला जेलीप्रमाणे खाल्ले जाते. अमेरिकेत डॉक्टर जरी न खाण्याचा सल्ला देत अमेरिकेच्या अनेक राज्यात खारीचा मेंदू आवडीने खाल्ला जातो.
६) रक्तही जेवणात –
लोक प्राण्यांच्या रक्ताचे पुडिंग किंवा पॅनकेक बनवून खातात. व्हिएतनाम,चीन, कोरिया अशा देशात प्राण्याच्या रक्तापासून बनवलेले दही प्रसिद्ध आहे.