१) चर्चा “एंटिलीया”ची नाही तर “गुलीटा”ची – जगात ज्या ज्या वेळी आलिशान बंगल्यांची चर्चा केली जाते, तेव्हा मुकेश अंबानीच्या एंटिलीया बंगल्याचे नाव येते. खरं तर मुकेश अंबानीच्या घराला बंगला म्हणणे पण योग्य नाही, कारण त्यांच्या घरापुढे अनेक राजांचे महालसुद्धा फिके आहेत. पण सध्या चर्चा होत आहे ती इशा अंबानीच्या गुलीटा बंगल्याची !
२) इशा अंबानीच्या बंगल्याचे फोटो व्हायरल – गतवर्षी डिसेंबर २०१८ मध्ये इशा अंबानीचा विवाह परिमल ग्रुपच्या आनंद परिमल यांच्यासोबत झाला होता. त्यांचे वडील अजय परिमल यांनी २०१२ मध्ये दक्षिण वरळी भागात हा बँगा विकत घेतला होता आणि लग्नात मुलगा आणि सुनेला गिफ्ट दिला होता. या बंगल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
३) ४५० कोटी रुपये आहे किंमत – इशा-आनंद यांचा बंगला “Sea Facing” म्हणजेच समुद्राच्या समोर आहे. सांगितले जाते की गुलीटा बंगल्याची किंमत ४५० कोटी रुपये आहे. या बंगल्याचा आकार ५०००० स्क्वेअर फूट आहे. एकूण पाच मजल्यांच्या या बंगल्यात तीन मजल्यांचे बेसमेंट आहे. सांगितले जाते की घरात असणाऱ्या बहुतांश वस्तू परदेशातून आयात केलेल्या आहेत.
ईशाच्या बंगल्याच्या आतमधील फोटो-
४) डायमंड थीमप्रमाणे तयार झालाय हा बंगला – गुलीटा बंगल्यातील खोल्या डायमंड थीमनुसार तयार करण्यात आल्या आहेत. बंगल्याबाहेर एक गार्डन आणि स्विमिंग पूलही आहे. बंगल्याच्या पार्किंग स्पेसमध्ये एकाच वेळी २० आलिशान गाड्या उभ्या करता येतील इतका तो मोठा आहे.
५) इशा अंबानीच्या लग्नाचीही चर्चा – इशा अंबानींचे लग्न एंटिलीया बंगल्यात झाले होते. तसेच उदयपूरच्या ओबेरॉय उदय व्हिला आणि सिटी पॅलेसमध्ये संगीत कार्यक्रम झाला होता. लग्नाची रिसेप्शन पार्टी जिओ गार्डनमध्ये झाली होती. लग्नात जवळपास ७०० कोटी रुपये खर्च झाले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.