विश्वचषकातील भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवापूर्वी भारतीय संघ विश्वचषकात अपराजित होता. इंग्लंडने उभारलेल्या ३३७ धावांचा पाठलाग करताना भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने शतकी खेळी केली पण ती व्यर्थ गेली.
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३३७ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडला जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोच्या सलामीच्या जोडीने दणदणीत सुरुवात करून दिली. सुरुवातीच्या दहा शतकात भारतीय गोलंदाजांनी त्यांना सतावले पण त्यानंतर या दोघांनी आक्रमक रूप धारण करत धावांचा पाऊस पाडला.
इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने अवघ्या ९० चेंडूत बेअरस्टोने ८ चौकार आणि ६ षटकारांसह शतक झळकावले. जेसन रॉय हा ६६ धावांची खेळून बाद झाला. त्यानंतर बेन स्टोक्सने आक्रमक ७९ धावांची खेळी खेळत इंग्लंडला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. भारताकडून मोहमद शमीने ५ विकेट घेतल्या.
धोनीची चूक पडली महागात?
इंग्लंडने भारताचा पराभव करून स्वतःला सेमीफायनलच्या रेसमध्ये कायम ठेवले. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना नशिबाने देखील साथ दिली. सुरुवातीलाच दोन वेळा बेअरस्टो थोडक्यात बचावला. त्यानंतर ११ व्या ओव्हरमध्ये जेसन रॉयचे नशीब फळफळले.
११ व्या ओव्हरमध्ये भारताने जेसन रॉयला बाद करण्याची संधी गमावली. हार्दिक पंड्याच्या ओव्हरमध्ये वाईड बॉलला खेळण्याचा प्रयत्न जेसन रॉयने केला. त्यावेळी बॉल मिस झाला आणि भारतीय संघाने जोरदार अपील केले. पण अम्पायरने नॉट आऊट देत वाईड बॉल असल्याचे सांगितले.
त्यावेळी कोहलीने धोनीला DRS साठी विचारले. पण धोनीने नकार दिला. डीआरएसला भारतात धोनी रिव्हिव्ह सिस्टीम म्हणून ओळखले जाते. धोनीने नकार दिल्याने कोहलीनेहि रिव्हिव्ह घेतला नाही. पण रिप्ले मध्ये ठळकपणे बॉल बॅटला लागून गेल्याचे दिसत होते. जेसन रॉय त्यावेळी बाद झाला असता तर कदाचित इंग्लंडचा संघ एवढ्या धावा करू शकला नसता.
जेसन रॉय त्यावेळी अवघ्या २० धावांवर खेळत होता. त्याने नंतर आक्रमक खेळ खेळात ६६ धावांची खेळी खेळली. बेअरस्टो आणि रॉयने इंग्लंडला मोठी सुरुवात करून दिली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.