अनेक लोकांना अंगावर मोस असण्याची समस्या असते. अनेकांच्या स्कीनवर मोस असते. शरीरातील ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे अंगावर मोस येतात. जे शरिरासाठी धोकादायक नसतात पण शरिराची सुंदरता खराब करतात. हे मोस तुम्ही काही घरगुती उपाय पद्धतीने घालवू शकता. स्कीन ट्यूमरच्या नावाने देखील हा ओळखला जातो. त्वचेवर होणारा असमान वाढ यामुळेही मोस तयार होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही देखील ते शरिरावरुन नाहीसे करु शकतात.
मोस नाहीसे करण्यासाठी ६ उपाय
सफरचंदचं व्हिनेगर मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.
लिंबाचा रस लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.
बटाट्याचा रस बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.
अननसाचा रस मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.
बेकिंग सोडा चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.
लसून लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.