२७ जून रोजी मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा १२५ धावांनी धुव्वा उडवला होता. या सामन्यात एका निर्णयाची खूप चर्चा झाली. रोहित शर्माला थर्ड अंपायरने चुकीचा निर्णय देत बाद ठरवले होते. या निर्णयाने अंपायरवर टीकेची झोड उठली होती. मैदानावर अंपायरने रोहित शर्माला नाबाद ठरवले होते.
केमार रोचच्या गोलंदाजीवर रोहितकडून बॉल मिस झाला आणि जोरदार अपील करण्यात आले. अंपायरने ते फेटाळले पण वेस्ट इंडिजने रिव्हिव्ह घेतला. थर्ड अंपायरने बॉल बॅटला लागत नसल्याचे दिसत असतानाही रोहितला बाद ठरवले होते.
रोहितच्या पॅडला लागून बॉल गेल्याचे दिसत होते पण अम्पायरच्या मते बॅटला बॉल लागला होता आणि रोहित बाद होता. त्याप्रकारे त्यांनी रोहितला बाद ठरवले. अनेकांनी या निर्णयाविरुद्ध नाराजी दर्शवली होती. सोशल मीडियावर देखील याबद्दल प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
रोहीतनेही तो कशाप्रकारे आऊट नव्हता याचा पुरावाच देऊन टाकला आहे. रोहितने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रोहितने दोन्ही अँगलने दाखवले आहे कि तो बॉल पॅडला लागला होता आणि तो नाबाद होता. या फोटोमध्ये बॉल पॅडला लागल्याचे ठळकपणे दिसत आहे.
रोहितने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. २३ बॉलमध्ये १८ धावा काढून रोहित बाद झाला होता. हा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला होता.
?♂️? pic.twitter.com/0RH6VeU6YB
— Rohit Sharma (@ImRo45) June 28, 2019
भारत या विश्वचषकात अजूनही अपराजित आहे. भारताचा पुढील सामना उद्या रविवारी इंग्लंड विरुद्ध होणार आहे. भारताने ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारताला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.