कैलाश विजयवर्गीय त्यांच्या वक्तव्यांबद्दल नेहमी चर्चेत असतात. त्यांची वक्तव्ये नेहमी हेडलाईन्स बनतात. मात्र यावेळेस त्यांचा २५ वर्षांपूर्वीचा एक फोटो हेडलाईन्सचा विषय बनली आहे. २६ जुनला त्यांचा आमदार मुलगा आकाश विजयवर्गीय याचा इंदूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत वाद झाला होता.
पावसाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने गंजी कंपाउंड भागातील जुन्या आणि पडायला झालेल्या इमारती पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानिमित्त हे अधिकारी तिथे आले होते. तेव्हा आकाश आणि त्या अधिकाऱ्यात वाद झाला आणि आकाशने त्यांना बॅटने मारले. त्यानंतर आकाशची रवानगी तुरुंगात झाली.
२५ वर्षांपूर्वी आकाशच्या वडिलांनीही अधिकाऱ्याला मारहाण केली होती
या घटनेनंतर लोकांनी आकाशच्या वडिलांचा २५ वर्षांपूर्वीचा फोटो शोधून काढला आहे. त्या फोटोत कैलाश विजयवर्गीय कुठल्यातरी अधिकाऱ्यावर बूट उगारताना दिसत आहेत. हा फोटो लोक सोशल मिडीयावर खूप शेअर करत आहेत. ते ही वेगवेगळ्या कॅप्शनसह ! कैलाश विजयवर्गीय आणि आकाश विजयवर्गीय यांच्या दोन्ही प्रसंगातील फोटो मध्यप्रदेश काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरुनही शेअर करण्यात आले आहेत.
त्यात म्हटले आहे, “सांगितले जाते की संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हस्तांतरित केले जातात. पहिला फोटो – १९९४ मध्ये पोलीस अधिकाऱ्यावर बुटाने वार करणारे इंदूरचे तत्कालीन आमदार कैलाश विजयवर्गीय ! दुसरा फोटो – २०१९ मध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणारे त्यांचे पुत्र आणि इंदूरचे विद्यमान आमदार आकाश विजयवर्गीय !
काय आहे प्रकरण ?
आज तक चॅनेलचे पत्रकार धर्मेंद्र शर्मा आणि मध्यप्रदेशातील वरिष्ठ पत्रकार यांना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण सांगितले. ही गोष्ट १९९४ मधील आहे. १९९३ मध्ये कैलाश विजयवर्गीय दुसऱ्यांदा इंदूरचे आमदार म्हणून निवडून आले होते.
त्या काळात पाण्याची समस्या भीषण बनली होती. संपूर्ण भागातील लोक गोंधळ करत होते. पाण्यासोबतच इतरही अनेक समस्या होत्या, ज्यावर महानगरपालिकेचे लक्ष नव्हते. लोकांच्या अडचणी घेऊन कैलाश विजयवर्गीय कमिशनरच्या घरावर मोर्चा घेऊन गेले.
नेमके काय घडले ?
घटनेची माहिती मिळताच तिथले एएसपी प्रमोद श्रीपाद फलणीकर आपल्या काफिल्यासह त्याठिकाणी आले. त्यांनी कैलाश विजयवर्गीय यांना कमिशनरला भेटण्यास मनाई करण्यात आली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि कैलाश विजयवर्गीय यांनी आपला बूट काढला आणि म्हणाले, “मी इथे कित्येकदा आलो आहे, तरीही मला त्यांना भेटू दिले जात नाही. हे बघा माझा बूट सुद्धा झिजला आहे.” हे बोलत असतानाच स्थानिक पत्रकार संजय चौधरींनी त्यांचा फोटो काढला.
ते पत्रकार आता हयात नाहीत. त्यावेळी विजयवर्गीयांवर कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. एकंदर फोटोत दाखवल्याप्रमाणे विजयवर्गीय बूट उगारत नव्हते तयार बूट किती झिजला आहे ते दाखवत होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.