सर्वसाधारणपणे जगामध्ये सर्व माणसांची शारीरिक संरचना जवळपास एकसारखीच असते. पण तरीही त्यांच्या लैंगिक ओळखीसाठी त्यांना गे, लेस्बियन, स्ट्रेट, होमोसेक्सुअल, हेट्रोसेक्सुअल आणि बायसेक्सुअल आदि नाव आणि शब्दांचा वापर केला जातो. वास्तवात आपली लैंगिक ओळख आपल्या हातात नसते, तर ती आपल्या जन्मासोबतच जोडलेली असते.
तुम्ही जरी कुठल्याही सेक्सुअल ओरिएंटेशनचे असला, तरी त्यामध्ये तुमची काहीही भूमिका नसते किंवा तुमचा काहीही दोष नसतो. आपण आपल्या लैंगिक ओळखीचा स्वीकार केला पाहिजे आणि समाजातील इतर लोकांसारखं जीवन जगले पाहिजे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे ओळखायला शिकवणार आहे की तुम्ही गे आहेत की नाही ?
असे ओळखाल आपल्या सेक्सुअल ओरिएंटेशन बद्दल
सेक्सुअल ओरिएंटेशन या शब्दाचा अर्थ लिंग (पुरुष आणि स्त्री) यासोबत आहे, ज्यामुळे व्यक्ती आकर्षित होत असतो. सेक्सुअल ओरिएंटेशन साधारणपणे तीन प्रकारचे असतात, ज्यांच्या आधारे तुम्ही आपल्या लैंगिकतेची ओळख करु शकता.
१) विषमलैंगिक ओळख –
जे लोक विषमलिंगी असतात ते लोक भिन्न लिंगाच्या व्यक्तींबाबत रोमँटिक भावनेचा अनुभव घेतात आणि शारीरिक रूपाने त्यांच्याकडे आकर्षित होतात. जसे की पुरुष महिलांकडे आकर्षित होतात आणि महिला पुरुषांकडे आकर्षित होतात. विषमलैंगिक लोकांना स्ट्रेट (Straight) म्हणले जाते.
२) समलैंगिकांची ओळख –
जे लोक समलैंगिक असतात, ते लोक सामान लिंगाच्या लोकांकडे शारीरिकदृष्ट्या आकर्षित होतात आणि त्या लोकांबद्दल त्यांना रोमँटिक भावना जाणवते. जसे की महिला इतर महिलांकडे किंवा पुरुष इतर पुरुषांकडे शारीरिकरीत्या आकर्षित होतात. पण महिला जर महिलेकडे आकर्षित झाली तर तिला लेस्बियन (Lesbian) आणि पुरुष जर पुरुषाकडे आकर्षित झाला तर त्याला गे (Gay) म्हणले जाते.
३) उभयलैंगिकांची ओळख –
जे लोक उभयलिंगी असतात ते लोक शारीरिकरीत्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही लिंगांच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात आणि त्या लोकांबाबत रोमँटिक भावनेचा अनुभव घेतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.