काल विश्वचषकात झालेल्या भारत-वेस्ट इंडिज मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा १२५ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने सेमीफायनलचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. मँचेस्टर येथे झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण रोहित शर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का लवकरच बसला. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने डाव सांभाळला.
केएल राहुल अर्थशतकाच्या उंबरठ्यावर असताना आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विजय शंकर आणि केदार जाधवला अपयश आले आणि भारताची अवस्था थोडी बिकट झाली. कोहलीने ७२ धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि धोनीने महत्वपूर्ण भागीदारी करत भारताला २६८ धावांपर्यंत पोहचवले.
वेस्ट इंडिजने धोनी मैदानात आल्यानंतर सुरुवातीलाच त्याला बाद करण्याची सोपी संधी गमावली. त्यावेळी भारताची धावसंख्या ३३ ओव्हरमध्ये ४ बाद १५४ होती. फैबियन एलनच्या गोलंदाजीवर धोनी अडखळत खेळत होता. धोनी त्यावेळी फक्त ८ धावांवर खेळत होता. धोनी त्यावेळी दबावात होता. धोनीने क्रिजच्या बाहेर येऊन षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि तो मिस झाला. त्यावेळी शाई होप कडे धोनीची स्टंपिंग करण्याची संधी होती. पण त्याच्याकडून ती संधी हुकली आणि धोनीला जीवनदान मिळाले.
धोनीची स्टंपिंग हुकल्यानंतर शाई होपला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. धोनीला बाद करण्याची जी संधी होपकडे होती तेवढ्या वेळात धोनीने वेस्ट इंडिजचा सर्व संघ बाद केला असता अशा प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.
बघा व्हिडीओ-
Watch “dhonistump_edit_1” on #Vimeo https://t.co/cxXmvWpl41
— Bablu Kumar (@BabluKu32751741) June 27, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.