‘चला हवा येऊ द्या’ पत्र फेम लेखक अरविंद जगताप झी मराठी वरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे आज रात्री प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रमोशनल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. झी मराठीच्या फेसबुक पेजवर शेअर केलेला हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे.
या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान जगताप यांनी राजकीय नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. अरविंद जगताप यांचा सहभाग असलेला ‘कानाला खडा’चा हा भाग शुक्रवारी म्हणजेच आज रात्री (२८ जून) ९.३० वाजता प्रदर्शित होणार आहे.
‘आज कार्यकर्त्यांची सगळ्यात वाईट अवस्था आहे असं मला वाटतं. कार्यकर्ता असण्याचा काळ संपला असून चमचे असण्याचा काळ सुरु झाला आहे. ताटातला गुलाबजाम तो ओठांपर्यंत नेतोय तर तो गुलाबजाम मला मिळालाय असं या चमच्यांना वाटतयं. हिच या चमच्यांची सगळ्यात मोठी अडचण झालीय. पण त्या चमचाचं काम ते कुणाच्या तरी ओठापर्यंत नेणं हे असतं. चमच्याच्या आयुष्यात फक्त खरकटं होणं हेच असतं. आज चमच्यांची संख्या ऐवढी वाढलीय की (ताटातून ओठापर्यंत नेण्याच्या) एवढ्याश्या प्रवासातच तो समाधानी होतोय. पण त्याला खरकटचं रहावं लागणार आहे आयुष्य. असं असलं तरी दोष त्याच्यावर येणार आहे कारण तो खरकटा दिसणार आहे. खाणारा रुमालाने तोंड पुसून निघून जाणार आहे आणि सध्या हेच होत आहे. आज साध्या नगरसेवक आणि तालुका अध्यक्षाच्या मागे पंधरा पंधरा पोर जय हो करत फिरतात बाईक घेऊन बापाच्या (पैशाने घेतलेल्या) पेट्रोलवर तेव्हा सर्वात जास्त दुर्देव वाटतं की ही तरुणपिढी कुठे चाललीय,’ अशी खंत जगताप यांनी व्यक्त केली आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.