तसं बघायला गेलं तर अंघोळीसाठी थंड पाणी वापरावे की गरम याचा निर्णय व्यक्तिनुरूप बदलत असतो. पण असा कुठलाही निर्णय घेण्यापुर्वी तुम्ही सध्या सुरु असणारा ऋतू, आपले वय, आपल्या सवयी, जुन्या काळापासून चालत आलेल्या प्रथा, आजार इत्यादि गोष्टींचा विचार केला पाहिजे. तथापि थंड किंवा गरम अशा दोन्ही पाण्याने अंघोळ करण्याचे आपापले अनेक फायदे आहेत. चला तर या लेखाच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकूया…
थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे
सकाळी थंड पाण्याने अंघोळ करण्याने आळसापासून सुटका व्हायला मदत होते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास डिप्रेशन दूर करणाऱ्या बीटा एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स स्रवायला मदत होते. तसेच पुरुषांच्या प्रजननशक्तीत सुधारणा करणाऱ्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सच्या स्रवणासाठी देखील मदत होते. फुफ्फुसाचे कार्य सुधारण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असते. थंड पाण्याने अंघोळ करण्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि लसीका ग्रंथी उत्तेजित होते आणि रोगांच्या संक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या पेशींची संख्या वाढते.
गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे
जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, गरम तापमान किटाणूंना अधिक गतीने नष्ट करतात. अशा प्रकारे गरम पाण्याने अंघोळ करण्यानेही शरीर साफ होते. अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे की, गरम पाणी स्नायूंची लवचिकता वाढवते आणि दुखणाऱ्या स्नायूंना आराम देण्यात मदत करते. गरम पाण्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यात मदत मिळते. याशिवाय गरम पाणी श्वसननलिका साफ करून सर्दी आणि खोकला उपचारासाठी फायदेशीर आहे.
आयुर्वेदानुसार अंघोळीसाठी थंड किंवा गरम पाण्याची निवड कशी करावी ?
आयुर्वेदात सांगितल्यानुसार आपल्या शरीरासाठी गरम पाणी आणि आपल्या डोळे व केसांसाठी थंड पाण्याचा वापर केला पाहिजे. आयुर्वेदानुसार पाण्याच्या तापमानाची निश्चिती पुढे दिलेल्या कारकांच्या आधारे केली पाहिजे.
१) वयावर आधारित – युवक आणि वृद्धांनी गरम पाण्याने अंघोळ करायला हवी. पण तुम्ही जर विद्यार्थी असाल आणि तुमचा अधिक वेळ तुम्ही अभ्यास करण्यात घालवतात असाल तर मग तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असते.
२) शरीराच्या प्रकारानुसार आधारित – जर तुमचे शरीर पित्तप्रधान प्रकारचे असेल तर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करायला हवी. याउलट जर तुमचे शरीर वातप्रधान किंवा कफप्रधान प्रकारचे असेल तर तुम्ही अंघोळीसाठी गरम पाणी वापरायला हवे.
३) रोगांवर आधारित – जर तुम्हाला पित्ताशी संबंधित कुठल्या रोगाने उदा.अपचन किंवा लिव्हर संबंधित कुठल्या आजाराने त्रस्त असाल, तर थंड पाण्याने अंघोळ करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर होईल. जर तुम्ही कफ किंवा वाताशी संबंधित आजारांनी त्रस्त असाल, तर गरम पाण्याने अंघोळ करा.जर तुम्हाला फिट्स येत असतील तर तुम्ही थंड आणि गरम अशा दोन्ही प्रकारच्या पाण्याने अंघोळ करण्यास मनाई करण्यात येत आहे, अशा लोकांनी कोमट पाण्याने अंघोळ करावी.
४) सवयीनवर आधारित – जर तुम्ही नियमित काम करत असाल तर तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करायला हवी. कारण आपल्या शरीरावरील घाम आणि किटाणू साफ करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करणे उपयुक्त असते,
५) वेळेवर आधारित – तुम्ही जर सकाळी अंघोळ करणार असाल तर थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असते. तुम्ही जे रात्री अंघोळ करत असाल तर आरामदायक झोप लागण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करावी. सायंकाळच्या वेळी वाताचा प्रभाव जास्त असल्याने त्यावेळी गरम पाण्याने अंघोळ केने फायदेशीर असते.
आयुर्वेदात अंघोळ करण्याची पद्धत कशी सांगितली आहे ?
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे घाईघाईत अंघोळ करणे हे घाईघाईत जेवल्यासारखंच आहे. त्याने शरीराला सर्व लाभ मिळत नाहीत आणि शरीराची सफाईही ठीकपणे होत नाही. तजेलपणा वाटण्यासाठी अंघोळीचा चांगला अनुभव घेणे गरजेचे आहे. शरीराच्या सर्व भागांत पाणी चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या आंघोळीच्या या पद्धतीचे पालन करा.
अंघोळीची सुरुवात आपल्या हात आणि पाय धुण्यापासून करा. जर थंड पाण्याने अंघोळ करणार असाल तर डोक्याकडून पायाकडे अंघोळ करत जा. याउलट गरम पाण्याने अंघोळ करणार असाल तर पायाची बोटे धुण्यापासून सुरुवात करत शेवटी डोक्याचे केस धुतले पाहिजेत. बाजारातील केमिकलयुक्त साबणा त्वचेला रुक्ष बनवतात, त्यामुळे अशा साबणा वापरणे टाळा.
अंघोळीपूर्वी मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाने शरीराला मालिश करणे फायदेशीर आहे. त्यामुळे स्नायूंच्या पेशी सैल होतात आणि त्वचेची कांती सुधारायला मदत होते. अंघोळ करताना घाई व्हायला नको आणि जास्त उशीरही व्हायला नको. चांगल्या स्वच्छतेसाठी दिवसातून दोनदा अंघोळ केली पाहिजे. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.