अलीबाबा आणि ४० चोर ही गोष्ट तुम्हाला आठवते का ? त्यात अलीबाबा आणि चोर “खुल जा सिम सिम ” बोलतात आणि गुहेचा दरवाजा आपोआप उघडला जातो. किंवा तुम्ही जेम्स बॉण्डच्या सिरीजमधील ते चित्रपट बघितले असतील, ज्यात कारसुद्धा कुठल्या हिरोपेक्षा कमी नसतात. कारसुद्धा ऐकते, समजून घेते आणि बोलतेसुद्धा !
अशीच एक कार आता आपल्या देशात आली आहे. ही कार तुमच्याशी बोलेल. तुमच्या आदेशावर चालू होईल. तुमच्या आदेशावर बंद होईल. तुम्ही सांगितलं तर म्युझिक सुरु होईल आणि खिडकी उघडेल ! या गाडीमध्ये कुठेही बटन नाही. नुसत्या व्हॉइस कमांडवर ही कार चालेल. जाणून घेऊया या कारबद्दल…
अशी कोणती आहे ही कार जी आवाजावर चालेल
या शानदार कारचे नाव आहे MG Hector ! यातील MG म्हणजे मॉरिस गॅरेजेस या ब्रिटिश ब्रॅण्डचे संक्षिप्त रूप आहे. MG मोटर्स ही ब्रिटन मधील ९० वर्षे जुनी ऑटोमोबाईल कंपनी आहे. २००५ मध्ये चीनच्या SIAC मोटर्स यांनी ही कंपनी विकत घेतली. त्यानंतर MG Rover चे नाव बदलून MG Moters असे केले. MG Hector ही कारसुद्धा SIAC यांनीच भारतात लाँच केली आहे. कारचे ९०% पार्टस भारतात बनले आहेत. ही कार गुजरातच्या हलोल मध्ये बनवली जात आहे.
काय खासियत आहे या कारची ?
१) MG Hector ही भारतातील पहिली इंटरनेट कार आहे. म्हणजेच ही २४ तास इंटरनेट सोबत जोडलेली राहील. या कारला स्पर्श करून किंवा आवाजाने कंट्रोल करता येते. MG Hector मध्ये १०० हुंडीक कनेक्टिव्हिटी फीचर्स बघायला मिळतील. म्हणजेच १०० हुन अधिक मार्गांनी ही कार इंटरनेटशी जोडलेली आहे.
२) MG Hector ही कार बटन फ्री कार आहे. Hello MG बोलून पुढे तुम्ही जे बोलाल किंवा आदेश द्याल त्यानुसार ही कार काम करते. या कारसाठी एक खास तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे. याचे नाव आहे iSMART Next Gen. आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मधून गाडीला काहीही कमांड देऊ शकता. विशेष म्हणजे ही भारतीय उच्चारानुसार काम करते. मायक्रोसॉफ्ट, रिलायन्स ग्रुप आणि अमेरिकेच्या सिस्को कंपनीच्या मदतीने बनवण्यात आले आहे.
३) MG Moters आपल्या ग्राहकांना मोफत इंटरनेट डेटा देणार आहे. भारतीय हवामानानुसार तिची रचना करण्यात आली आहे. MG ने पल्स हब नावाचे कन्झ्युमर फोरम बनवले आहे, ज्यात आपल्या कारची दुरुस्ती किंवा आपल्याला इमर्जन्सी सेवा देण्यात येतील.
कारची किंमत किती आहे ?
भारतात या कारची किंमत १२.१८ लाख ते १६.८८ लाख दरम्यान ठेवण्यात आली आहे. ही एक ५ सीटर SUV कार आहे. याच रेंज मध्ये टाटा हैरीयर, जीप कंपस, ह्युंडाई क्रेटा, किआ मोटर्सची सेलटॉस सारख्या SUV कार बघायला मिळतील.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.