बलात्कार आणि पत्रकाराची हत्या केल्याच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीमला तुरुंगातुन काही दिवस सुट्टी पाहिजे. त्यासाठी त्याने दिलेले कारण ऐकाल तर तुम्ही म्हणाल “वाह, पिताजी वाह !” राम रहीम बाबाचे भक्त त्याला याच नावाने हाक मारतात. तुम्ही म्हणाल कैद्यांना तर तुरुंगातून बाहेर पडण्याची परवानगी असते, त्यात काय मोठी गोष्ट आहे ?
चर्चा तर होणारच
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम बाबा हा साधासुधा माणूस नाही. हरियाणामध्ये त्याच्या भक्तांची संख्या प्रचंड आहे. त्याच्यासारख्या चर्चित आणि ताकतवर अपराध्याच्या पॅरोलचा विषय असल्यावर चर्चा तर होणारच ना ! त्यात आता हरियाणा विधानसभा निवडणुका येत आहेत. बाबाच्या भक्त परिवाराच्या भावना आणि त्याचा पॅरोल या दोन गोष्टीत कोणते धागे जुळलेले आहेत ते जर तुम्हाला ओळखता आले तर बघा !
पॅरोलसाठी दिला हा बहाणा
बाबा राम रहीमने पात्र लिहून मागणी केली आहे की प्रशासनाने त्याला पॅरोलवर ४२ दिवसांची सुट्टी द्यावी. त्या पत्रात त्याने पॅरोलसाठी शेती करण्याचा बहाणा सांगितला आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, बाबा जवळ शेती करण्यायोग्य जमीनच नाही. सगळी जमीन डेरा सच्चा सौदाच्या ट्रस्टच्या नावावर आहे. म्हणजेच ज्या कारणासाठी बाबाने पॅरोलवर सुट्टी मागितली आहे, त्याच्या कारणताच गडबड आहे.
मुख्यमंत्रीही आहेत पॅरोलच्या समर्थानात
राम रहीमला पॅरोलवर सुट्टी द्यायची का नाही याचा निर्णय रोहतकच्या सुनारिया कारागृह प्रशासनाने घ्यायचा आहे. मात्र हरियाणा सरकारमधील मंत्री याबाबतीत वाचाळवीराप्रमाणे वक्तव्य देत आहेत. बलात्कारी आणि खुन्याला पॅरोल मिळावा म्हणून खुलेआम त्याचे समर्थन करत आहेत.
कायद्याची जाण असणारे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीसुद्धा याविरोधात मवाळ धोरण अवलंबले आहे. सरकारमधील एक मंत्री अनिल वीज म्हणतायत की बाकी कैद्यांप्रमाणे राम रहीम यांना वागणूक मिळावी. कारागृह मंत्री कृष्णलाल म्हणतायत की बाबाच्या पॅरोलवर प्रशासन विचार करत आहे, तोपर्यंत कुणीही याचा राजकीय संबंध जोडू नये.
प्रशासन आणि पोलिसांचे काय म्हणणे आहे
महसूल विभागातील तहसीलदारांनी आपल्या अहवालात सांगितले आहे की, डेरा सच्चा सौदाकडे एकूण २५० एकर जमीन आहे, या जमिनीच्या कागदपत्रांवर कुठेही मालक किंवा शेतकरी म्हणून राम रहिमचे नाव नाही. या अहवालाच्या आधारे पॅरोलचा अर्ज फेटाळून लावला जाऊ शकतो.
हरियाणा पोलिसांचा गुप्तचर अहवालही बाबाला पॅरोलच्या देण्याच्या विरोधात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण बाबाला शिक्षा सुनावली होती तेव्हा भक्तांनी फार तोडफोड केली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.