ऑक्टोबर महिन्यानंतर शुजीत सरकारचा पुढचा चित्रपट येत आहे. “गुलाबो सिताबो” असं त्या चित्रपटाचं नाव आहे. जितकं मनोरंजक नाव आहे, त्यापेक्षा जास्त मजेदार चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात आपापल्या काळातील दोन उत्कृष्ठ कलाकार काम करत आहेत. चला तर मग या चित्रपटाबद्दल मनोरंजक माहिती आणि इतर गोष्टी जाणून घेऊया…
अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा एकत्र काम करणार
अमिताभ आणि आयुष्यमान या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काम करणार आहेत. एक मनोरंजक गोष्ट अशी कि अमिताभ आणि आयुष्यमान या दोन्ही कलाकारांनी शुजीत सरकारच्या वेगवगेळ्या चित्रपटात काम केले आहे. अमिताभने “शुबाईट आणि पिकू” या चित्रपटात तर आयुष्यमानने “विकी डोनर” या चित्रपटात काम केले आहे. शुबाईट रिलीज होऊ शकली नाही, मात्र पिकू आणि विकी डोनर चित्रपटाचे खुप कौतुक झाले.
काय आहे चित्रपटाची कथा ?
चित्रपटाची कथा लखनौस्थित एका कुटुंबावर आधारित आहे. यामध्ये अमिताभ बच्चन एक लखनवी मुस्लिम बनले आहेत. तसेच ते त्या घराचे मालक आहेत, ज्यात आयुष्यमान राहत असतो. ही या दोन लोकांची कथा आहे. चित्रपटाची कथा अमिताभ आणि ऋषी कपूरच्या “१०२ नॉट आऊट” सोबत मिळतीजुळती आहे. पण शुजीत सरकारच्या मागच्या पिकू, विकी डोनर सारख्या चित्रपटांची कथा पाहता हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असणार हे नक्की आहे.
चित्रपटाच्या नावाचा अर्थ काय ?
चित्रपटाच्या नावाचा अर्थ काय याबद्दल शुजीत सरकारला विचारल्यावर त्याने चित्रपटाची वाट बघण्यास सांगितले. नंतर शोध घेतला असता समजले की ही बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या दोन व्यक्तींची कथा आहे, जे लखनौ आणि उत्तरप्रदेशात खूप प्रसिद्ध आहेत. सांगितले जाते की त्यांचा संदर्भ स्थानिक भाषांतील अनेक गाणी आणि कथांमध्ये येतो. सिताबो ही एक थकलेली पत्नी आहे जिच्या आयुष्यात काही मजा उरली नाही. तर दुसऱ्या बाजूला गुलाबो ही एक सुंदर वेश्या आहे.
अमिताभचा सिक्वेन्स लीक झाला
चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अमिताभचा एक सिक्वेन्स लीक झाला होता. त्या सिक्वेन्समध्ये अमिताभ लखनऊच्या गोमती नदीच्या किनारी बकऱ्या चारताना दिसत आहे. त्यानंतर काही दिवसांनंतर लगेच हा नवीन लूक लाँच करण्यात आला. एका वयोवृद्ध घरमालकाच्या रोलमध्ये अमिताभ निळ्या रंगाचा कुर्ता, मुस्लिम पाद्धतीची टोपी, ढलेली दाढी आणि चष्मा घातलेल्या एका ७६ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या वेशात दिसून येत आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.