लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान सोशल मिडीयावर गाजलेली उत्तरप्रदेशच्या लखनौ येथील PWD अधिकारी रिना द्विवेदी पहिल्यांदा जेव्हा चर्चेत आल्या होत्या,त्यावेळी त्या पिवळी साडी घालून लखनौच्या मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी म्हणून ड्युटी बजावण्यासाठी पोहोचल्या होत्या.
त्यावेळी त्यांचे पिवळ्या साडी आणि काळ्या गोगलमधील रूप एखाद्या मॉडेल पेक्षा कमी नव्हते. आता त्या मॅडम परत एकदा चर्चेत आहेत. यावेळेस त्यांचा टिकटॉकवरचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे, ज्यात त्या डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ युट्युबवर सुद्धा अपलोड केला गेला आहे.
काय आहे या व्हिडिओत ?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत रिना द्विवेदी पिवळ्या रंगाचा गाउन घातलेल्या दिसत आहेत. त्यात त्या आपल्या घरातच डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमधील त्यांच्या डान्सची अदा आणि ठुमके सोशल मीडियावर भरपूर शेअर होत आहेत. याशिवाय त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत तर त्या एकदम बोल्ड अंदाजात मिनी स्कर्ट घालून डान्स करताना दिसत आहेत. सोशल मिडीयामध्ये हे व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
नुकतीच एक बातमी समोर आली होती की रीना द्विवेदी यांना बिग बॉस मध्ये सहभागी होऊन आपली ठोस अशी ओळख बनवायची इच्छा होती. आश्चर्याची बाब ही की लखनौमध्ये PWD अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि उत्तरप्रदेशच्या देवरिया मध्ये राहणाऱ्या रिना द्विवेदी यांना एक १३ वर्षांचा मुलगा आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.