स्वामी विवेकानंद यांचे विचार नेहमीच प्रेरणा देणारे आहेत. स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की डोळ्यापुढं येतं ते त्यांचं जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणानं विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. स्वामी विवेकानंद यांना एकदा एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता. त्याला स्वामींनी दिलेले उत्तर नक्की वाचा..
एकदा स्वामी विवेकानंद यांना एका व्यक्तीने विचारले- स्वामीजी या जगात सर्वात जास्त महत्त्व आईलाच का दिले जाते?
स्वामीजी हसून त्या व्यक्तीला म्हणाले- सर्वात आधी तू समोर पडलेला दगड कपड्यात गुंडाळून कंबरेला बांधून घे. त्यानंतर उद्या मला येऊन भेट मग मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.
त्या व्यक्तीने स्वामीजींच्या आज्ञेचे पालन केले आणि कंबरेवर दगड बांधून घेतला. थोड्यावेळाने तो व्यक्ती पुन्हा स्वामीजींकडे आला आणि म्हणाला गुरुजी तुम्ही मला एक प्रश्न विचारल्यामुळे एवढी मोठी शिक्षा का दिली?
स्वामीजी म्हणाले- तू या दगडाचे ओझे काही काळही घेऊ शकला नाही. याउलट एक आई आपल्या मुलाला पूर्ण नऊ महिने गर्भात ठेवते. घरातील संपूर्ण काम करते, कधीही काम अपूर्ण ठेवत नाही. थकवा आला तरी हसून सर्वांना सामोरे जाते. या जगात आईपेक्षा दुसरे कोणीही सहनशील नाही. यामुळे आईला महान मानले जाते.
कथेची शिकवण
या छोट्या कथेची शिकवण ही आहे की, आपण आपाल्या आईचा तसेच सर्व महिलांचा मान-सन्मान, आदर करावा. महिलांची सहनशीलता पूजनीय आणि सन्माननीय आहे. कधीही कोणत्याही महिलेचा आणि आईचा अपमान करू नये.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.