उत्तराखंडचे स्वित्झर्लंड म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या औली येथे सहारनपुरचे मूळ असणारे अनिवासी भारतीय गुप्ता बंधूंच्या मुलांचे लग्न होत आहे. १८ ते २२ जून दरम्यान त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. भारतात हे हाय प्रोफाईल लग्न होत असल्याने देश दुनियेतील लोकांच्या नजरा आता औलीकडे लागल्या आहेत. पाहूया भारतात होणाऱ्या या खास लग्नातील खास वैशिष्ट्ये…
कोण आहेत हे नवदाम्पत्य ?
दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले आणि मूळचे भारतीय असणारे अजय गुप्ता, अतुल गुप्ता आणि राजेश गुप्ता हे ते तीन बंधू आहेत. त्यांच्या मुलांचा औली येथे विवाह सोहळा पार पडणार आहे. अजय गुप्ता यांचा मुलगा सूर्यकांत याचा विवाह १८ ते २० जून दरम्यान दिल्लीच्या हिरे व्यापारी सुरेश सिंघल यांची मुलगी कृतिका हिच्यासोबत होणार आहे.
तर अतुल गुप्ता यांचा मुलगा शशांक याचा विवाह २० ते २२ जून दरम्यान दुबईचे रिअल इस्टेट उद्योजक विशाल जलान यांची मुलगी शिवांगी हिच्यासोबत होणार आहे. हा लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सूर्यकांत यांची पत्नी दिल्लीची तर शशांक यांची पत्नी दुबईची आहे.
२ किलो चांदीची लग्नपत्रिका
एका बाजूला लग्नाची जोरदार तयारी सुरु असतानाच लग्नाच्या निमंत्रणासाठी गुप्ता बंधूंनी दोन किलो चांदीपासून लग्नपत्रिका बनवण्यात आली आहे. एका पत्रिकेची किंमत ८ लाखांपर्यंत आहे. पत्रिकेत पानांऐवजी चांदीच्या ६ प्लेट आहेत. लग्नातील संपूर्ण कार्यक्रम त्यावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहण्यात आला आहे. त्यावर बद्रीनाथ आणि केदारनाथाचा फोटो आहे. १०० पुरोहितांचा समूह हे लग्न लावणार आहे. जगभरातील ४०० हुन अधिक खाद्यपदार्थ आस्वादासाठी ठेवण्यात आले आहेत. लग्नानंतर नवदाम्पत्य त्रियुगीनरायण येथे भगवान शंकर पार्वतीचे दर्शन घेणार आहेत.
पाहुण्यांसाठी हेलिकॉप्टरने येण्याजाण्याची सोय
गुप्ता बंधूंच्या मुलांच्या लग्नासाठी येणाऱ्या सर्व VVIP पाहुण्यांसाठी दिल्ली, मुंबई आणि चंदिगढ येथून औली पर्यंत थेट हेलिकॉप्टरने येण्याजाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी २०० हेलिकॉप्टर बुक करण्यात आली आहेत. १६ जून पासूनच पाहुण्यांची ने-आण करण्यात येणार आहे. तसेच पाहुण्यांना राहण्यासाठी फाईव्ह स्टार सुविधायुक्त तंबू उभारले जात आहेत. लग्नासाठी आलेल्या कुठल्या पाहुण्याला बद्रीनाथ किंवा केदारनाथला जायचे असल्यास त्यांच्यासाठी औलीपासून हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आहे.
स्वित्झर्लंडवरुन ५ कोटी रुपयांची फुले आणुन सजावट
गुप्ता बंधूंच्या मुलांच्या लग्नात सजावट करण्यासाठी संपूर्ण औलीला फुलांच्या गुच्छांनी सजवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वित्झर्लंडवरुन ५ कोटी रुपयांची फुले मागवण्यात आली आहेत. दिल्लीस्थित एका कंपनीला लग्नाचे नियोजन देण्यात आले आहे. लग्न झाल्यानंतर औलीत केरकचरा होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीचे ८०० लोक कार्यरत आहेत.
५० बॉलिवूड सितारे लग्नात दिसणार
लग्नासाठी बॉलिवूड मधील कॅटरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहिद कपूर यांच्यासोबतच जवळपास ५० ते ५५ स्टार्स निमंत्रित करण्यात आले आहेत. लग्नसोहळ्यादरम्यान शंकर एहसान लॉय, कैलाश खेर, विशाल शेखर आपल्या आवाजात पेशकश सादर करणार आहेत.
अभिनेत्री उर्वशी रौतेला या लग्नामध्ये आपला डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे. एका आंतरराष्ट्रीय म्युझिक कंपनीसोबतच एक रोकरस ग्रुप पाहुण्यांचे मनोरंजन करणार आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.