काही चांगल्या लोकामुळे आजही मानवता जिवंत आहे असे अनेक लोक म्हणतात आणि याचाच प्रत्यय या घटनेतून तुम्हाला मिळणार आहे. मानवता आणि मोठ्या मनाचा असाच काही प्रकार राजस्थान मध्ये बघायला मिळाला आहे. या दाम्पत्यामुळे एका बाळास जीवदान मिळाले आहे. हे कपल म्हणजे फिल्ममेकर विनोद कापड़ी आणि त्यांची पत्नी साक्षी जोशी हे आहेत.
तर झाले असे कि पीहू चित्रपट बनविणारे विनोद कापड़ी यांचे लक्ष सोशल मिडियावरील एका पोस्ट कडे गेले. तो व्हिडीओ बघून त्यांना धक्काच बसला. या व्हिडीओ मध्ये एक बाळ कचऱ्यात पडलेले होते आणि बाळ जीवाच्या आकांताने रडत होते. लोक जात येत होते परंतु या बाळाला कोणीही उचलत नव्हते. त्याच क्षणी त्यांनी आपल्या पत्नीला बोलून एक मोठा निर्णय घेतला कि या बाळाला आपण दत्तक घेऊ.
हे दिसते तेवढे सोपे नव्हते कारण त्यांना माहिती नव्हते कि हे बाळ कुठे आहे आणि त्याचा शोध कसा घ्यायचा. यासाठी त्यांनी या बाळापर्यंत पोहचायला सोशल मीडियाची मदत घेतली. साक्षी जोशी आणि विनोद कापडी यांनी हा व्हिडीओ आपल्या twitter खात्यावर शेअर केला आणि या बाळापर्यंत पोहचवण्याची सर्वाना विनंती केली.
आणि सर्व नेटीजन्सनि त्यांना मदत केली आणि आणि ती मुलगी राजस्थान मध्ये नागोर जिल्ह्यात मिळाली. बाळाचा पत्ता लागल्यावर त्यांनी सर्वप्रथम बाळाला दवाखान्यात भर्ती केले. तिच्या तब्येती मध्ये आता सुधारणा होणार आहे असे सांगण्यात येत आहे. आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. सोशल मिडीयावर या निर्णया बद्दल प्रशंसा करत आहे.
लोक म्हणतात मुले आपल नशीब घेऊन जन्माला येतात आणि या बाळाणे आपल नशीब ठरवल आहे. आणि विनोद कापडी आणि साक्षी जोशी त्या लोकांकरिता जे मुलींना डोक्यावरच ओझ समजतात.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.