फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला असून पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मान देण्यात आला.
मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकूण तेरा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये काँग्रेसमधून भाजमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीमधून भाजपवासी झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मनाचे पान देण्यात आले आहे. या दोघांनी अनुक्रमे एक व दोन नंबरला शपथ घेतली.
या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या १० मंत्र्यांनी शपथ घेतली असून शिवसेनेच्या २ तर रिपाईच्या एका मंत्र्याने शपथ घेतली आहे. विखेपाटील शपथ घेताना कोणीही टाळ्या किंवा घोषणा दिल्या नाहीत. मात्र, शिवसेनेचे क्षीरसागर यांनी शपथ घेताना आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर शेलारांच्या वेळीही भाजपा जिंदाबादचे नारे देण्यात आले.
अपेक्षेप्रमाणे मागील काही दिवसापासून वादात सापडलेले आ. प्रकाश मेहता यांचे मंत्रीपद गेले आहे. तसेच आ. राज कुमार बडोले आणि दिलीप कांबळे हे देखील मंत्रिमंडळातून आउट झाले आहेत.
भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, अशोक उईके, योगेश सागर, अनिल बोंडे, संजय कुटे, बाळा भेगडे, परिणय फुके, अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. रिपाईकडून अविनाश महातेकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, अशोक उईके, अनिल बोंडे, संजय कुटे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर योगेश सागर, परिणय फुके, अतुल सावे आणि संजय बाळा भेगडे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.