इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषकाच्या सामन्यात रंगात यायला सुरु झाली आहे. पण पावसामुळे या विश्वचषकात सतत व्यत्यय येत आहे. आतापर्यंत चार सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यावेळेस राखीव दिवसही ठेवण्यात आलेला नाहीये. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान होणाऱ्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे.
या सामन्याची वाट प्रेक्षक मागील ४ वर्षांपासून बघत आहेत. विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असतो. विशेष म्हणजे यावेळेसचा भारत-पाकिस्तान सामना फादर्स डेच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याची मोठी उत्सुकता आहे.
मागच्या वेळेस फादर्स डेला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात कोणी मारली होती बाजी-
भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की क्रिकेटच्या चाहत्यांना मेजवानीच असते. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. रविवारी १६ तारखेला मॅचेस्टर येथे हा ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. २०१७ मध्ये फादर्स डेच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली होती.
यंदाच्या फादर्स डेला भारतीय संघाला या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. भारतीय संघ विश्वचषकात पाकिस्तानसोबत एकही सामना हरला नाहीये. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड असणार आहे. २०१७ च्या फादर्स डे ला देखील सोशल मीडियावर बाप-बेटा अशी चर्चा रंगली होती. मात्र या सामन्यात भारताचा पराभवास तोंड द्यावे लागले होते.
२०१७ मध्ये चॅम्पिन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने १८० धावांनी भारताचा मानहाणीकारक पराभव केला होता. या सामन्यात भारताची भक्कम फलंदाजी अपयशी ठरली होती. ओव्हलवर झालेल्या या मानहाणीकारक पराभवचा वचपा भारताने काढावा अशी चाहत्यांची इच्छा असणार आहे.
सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान चाहत्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष शिघेला पोहचला आहे. दोन्ही संघाचे चाहते आपापल्या संघाला पाठिंबा दर्शवत आहेत. जाहीरात, मिम्सच्या माध्यमांतून आपल्या संघाला पाठिंबा देत आहेत.
पावसाने या सामन्यात व्यत्यय नाही आणल्यास नेहमीप्रमाणे युद्ध अनुभवायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे चाहतेही या सामन्याची तेवढ्याच अतुरतेने वाट पाहत आहेत.माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.