Wednesday, February 8, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

गणपती उत्सवाचे जनक असल्याचा दावा करणारे भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळास धमकीचे पत्र..

khaasre by khaasre
August 22, 2017
in बातम्या
1
भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळास धमकीचे पत्र, वाचा मंडळाचा इतिहास

पुण्यातील पहिले गणपती मंडळ असण्याचा दावा करणारे भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ परत चर्चेत आले आहे. कारण आहे त्यांना आलेले धमकीचे पत्र जीवे मारण्याची धमकी…

मागील वर्षीही २ धमकीची पत्रे आली होती. अशा धमकीच्या पत्रांना न घाबरता आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत. उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीला आम्ही उपस्थित राहून पुरावे सादर करू, असे रंगारी गणेश मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे यांनी सांगितले आहे. आज आलेल्या धमकीच्या पत्रासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार देणार आहोत, अशीही त्यांनी माहिती दिली.

धमकीच्या पत्रात लिहलेला मजकूर खालीलप्रमाणे आहे..

‘तुम्हाला ठेचल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही…. तुमच्या मागण्या फालतू आणि निराधार आहेत. तुमच्यावर टिचून कार्यक्रम पार पाडला. कोण भाऊ रंगारी कोणी ओळखत नाही. तुमची कपडे काढून धिंड कायला पाहिजे. नाक तर ठेचले आहे, आत्ता तुम्हाला ठेचायचे आहे. तुम्ही सीमा पार केली आहे. तुमचे कोणतेही पुरावे आम्हाला अमान्य आहेत. उपोषण केले, भुकेनेच मेला तर बरे होईल, नाहीतर आम्ही बघूच. फालतू गोष्टीत पडू नका, नाही तर सशस्त्र क्रांती काय असते, हे येत्या २० दिवसात तुम्हाला दाखवू. नाटक बंद कारा, नाही तर जीभ राहणार नाही इतिहास सांगायला.’

भाऊ लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक

प्रस्थापित इतिहासलेखकांनी आपल्या लेखणीचा गैरवापर करत खरा इतिहास पुसुन चुकीचा इतिहास प्रचलित केल्याचे अजुन एक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. जातकेंद्री इतिहासलेखकांनी बांधलेल्या इतिहासाच्या तिरक्या भिंतीचे लेखणीने मोठे केलेले चिरे आता त्यांच्यावरच कोसळु लागले आहेत. यावेळेस तो चिरा बाळ गंगाधर टिळकांच्या रुपाने कोसळला आहे. यापुर्वीच महात्मा ज्योतिराव फुलेंनी १८६९-७० मध्ये सुरु केलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे जनकत्व बा.गं. टिळकांच्या नावावर खपविण्याचा जातकेंद्री प्रकार उघडकीस आला असताना परत आता भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्येच सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व टिळकांच्याच नावावर खपवले गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हे सहन न झाल्याने आता पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला खरा इतिहास उघड करु नका अशा धमक्या देणारी पत्रे यायला सुरुवात झाली आहे. खोट्या इतिहासाचा पर्दाफाश झाल्यामुळे नेमकी कुणाच्या बुडाखाली आग लागली असेल ते वेगळे सांगायला नको.वस्तुतः भाऊसाहेब रंगारी हे एक जबरदस्त क्रांतिकारक होते. त्यांच्या वाड्यामध्ये क्रांतिकारकांना गुप्तपणे शस्त्र चालवण्याचे शिक्षण दिले जायचे.

आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी ब्रिटिशांविरोधात क्रांतीकार्य चालविले होते. नुकताच त्यांच्या वाड्यातील शस्त्रासाठाही सापडला आहे. भाऊसाहेबांचा शालुंना रंग देण्याचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांचे जावळे आडनाव मागे पडुन रंगारी हे नाव प्राप्त झाले. ते उत्तम राजवैद्य होते. त्यांच्या राहत्या घरी आयुर्वेदिक दवाखाना होता. Richard I. Cashman यांच्या The Myth of Lokmanya : Tilak and Mass Politics in Maharashtra या पुस्तकात त्यांचा उल्लेख “Bhau Lakshman Javle, was a Maratha whom the police considered an extremely dangerous and troublesome man” असा उल्लेख आला आहे, यावरुन त्यांचा दरारा लक्षात येईल.

१८९२ साली सर्वप्रथम भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सव सुरु केला. २६ सप्टेंबर १८९३ च्या केसरीच्या अग्रलेखात टिळक स्वतः लिहतात की, सालाबादपेक्षा यंदा गणेशोत्सवास अधिक सार्वजनिक स्वरुप आले असुन ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत. ते गृहस्थ दुसरेतिसरे कोणी नसुन भाऊसाहेब रंगारी हेच होते. सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची सुरुवातही भाऊसाहेबांनीच केली. टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग घेतला.

तत्कालीन सामाजिक जीवनातही भाऊसाहेबांना मानाचे स्थान होते. दारुवाला पुलावरील हिंदू-मुस्लिम दंगल थांबवणारे व्यक्तिमत्व म्हणुन दस्तुरखुद्द टिळकांचे सहकारी न.चि. केळकर यांनी भाऊसाहेबांचा उल्लेख केला आहे.

मात्र आपल्याकडे चित्रपटातुनही चांगला इतिहास कसा दुसर्यांच्याच नावावर खपवला जातो आणि इतिहास घडविणाऱ्यांना कसे डावलले जाते याचा “सुबोध” आपल्याला यावरुन घेता येईल. १९०५ मध्ये आधीच आपले मृत्युपत्र बनवुन स्वतःच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची तजवीज करणाऱ्या भाऊसाहेबांनी आपली सर्व संपत्ती सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दान दिली होती. विशेष म्हणजे आपल्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणुन त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीची साक्ष घेतली होती.
जुन १९०५ रोजी भाऊसाहेबांचे निधन झाले. त्याचीही बातमी २० जुन १९०५ च्या अंकात केवळ एका वाक्यात छापुन केसरीने त्यांची उपेक्षा केली.

भाऊसाहेबांचा इतिहास बराच मोठा आहे. इतके दिवस भाऊसाहेब रंगारी हे नाव आणि चरित्र उपेक्षेच्या गर्तेत अडकले होते. पण आता उपेक्षेचा काळ संपला आहे. उशिरा का होईना सत्य समोर आले आहे. अजुन बराच उलगडा होणे बाकी आहे. सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी धडपडणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. शेवटी सत्य ज्यांच्या बाजुने असते त्यांचाच विजय असतो…

जिज्ञासुंनी अवश्य भेट द्या.
ठिकाण
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, अप्पा बळवंत चौक, पुणे.
अनिल माने.

Loading...
Tags: ganapatipunetilak
Previous Post

मराठा क्रांती मोर्चा एक प्रवास चळवळ ते ……

Next Post

वाचा कोणत्या राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात…

Next Post
वाचा कोणत्या राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात…

वाचा कोणत्या राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात...

Comments 1

  1. Pingback: सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना हि खबरदारी घ्या आणि अपघातापासून वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In