इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पावसामुळे बरेच सामने रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द झाले आहेत. सोमवारी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी श्रीलंका आणि बांगलादेश या सामन्यावरही पावसानं पाणी फिरवलं.
याआधी ७ जूनला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम यंदा नोंदवला गेला आहे. यंदा १० संघासोबत ११ वा पाऊसही खेळ खेळताना दिसत आहे.
यंदा वर्ल्ड कप हा राउंड रॉबिन पद्धतीने खेळण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक सामना हा प्रत्येक संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशात सामने रद्द झाल्याने अनेक चांगल्या संघांच्या वाटचालीत अडचणी निर्माण होत आहे. उद्या भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सामना होणार आहे. तर १६ तारखेला पाकिस्तानसोबत महामूकाबला होणार आहे. या सामन्यांवर देखील पावसाचं सावट आहे.
या पावसाच्या खेळामुळे केदार जाधवने एक व्हिडीओ बनवला आहे जो खूप व्हायरल झालेला बघायला मिळत आहे. इथे आपला महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय तर तिकडे इंग्लंडमध्ये पावसामुळे वर्ल्ड कपचे सामने रद्द होतायत. त्यामुळेच भारतीय संघातील फलंदाज केदार जाधवने इंग्लंडमधील पावसाला जा रे जा रे पावसा.. माझ्या महाराष्ट्रात जाऊन बरस अशी भावनिक साद घातली आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.