२०१९ च्या विश्वचषकातील भारताची पहिलीच मॅच ! दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून भारताने विश्वचषकामध्ये विजयी सुरुवात केली. रोहित शर्मा आणि यजुवेंद्र चहल यांनी या विजयात महत्वाचा वाटा उचलला. बातम्यांमध्ये दोघेजण चर्चेत राहिले. पण पण अजून एक खेळाडू आहे जो नेहमी बातम्यांमध्ये असतो, तो यावेळीही एका बातमीमुळे चर्चेत होता. महेंद्रसिंह धोनी ! धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात धोनी आपले हॅन्डग्लोव्ह्ज उतरवत असल्याचे दिसत आहे. त्या ग्लोव्ह्जवर पॅरा स्पेशल फोर्सेसचे बलिदान चिन्ह “पलटणीची कट्यार” छापलेले होते.
सोशल मीडियावर धोनीच्या ग्लोव्ह्जचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक धोनीचे कौतुक करायला लागले. धोनीच्या आर्मी आणि देश्प्रेमासाठी लोकांनी भरभरून टाळ्या वाजवल्या. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला धोनीची ही कृती आवडली नाही. बोर्ड ऑफ बोर्ड्सने सांगितले की मॅचमध्ये खेळायला उतरताना असे कोणतेही विशेष चिन्ह परिधान करणी नियमांच्या विरोधात आहे. त्यांनतर आयसीसीने अधिकृतरीत्या बीसीसीआयकडे विनंती केली की, धोनीच्या ग्लोव्ह्ज वरुन हे विशेष चिन्ह काढावे. धोनीची असे करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्याला काही शिक्षा होणार नाही, परंतू इथून पुढे त्याला असे करता येणार नाही.
आपल्या ग्लोव्ह्जवर बलिदान चिन्ह लावण्यामागचे कारण काय ?
वास्तविक पाहता धोनीने आपल्या ग्लोव्ह्जवरिल बलिदान चिन्ह हौस म्हणून लावले नव्हते. भारतीय आर्मीतील पॅरा स्पेशल फोर्सेसचे प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या या चिन्हाला बलिदान चिन्ह असेही म्हणतात. फक्त पॅरा स्पेशल फोर्सच्या सदस्यांनाच हे चिन्ह वापरता येते. धोनीला भारतीय आर्मीने लेफ्टनंट कर्नल पदाची मानद रँक दिलेली आहे. धोनीने २०१५ मध्ये पॅरा ब्रिगेडच्या अनुसार ट्रेनिंग सुद्धा घेतलेली आहे. तसेच ही पहिली वेळ नव्हती जेव्हा धोनीने हे विशेष चिन्ह असलेली वस्तू वापरली आहे. पण क्रिकेटच्या मैदानावर त्याची अशी पहिलीच वेळ होती. यापूर्वी त्याने मैदानाबाहेरच हे चिन्ह असणाऱ्या वस्तू वापरल्या आहेत.
बीसीसीआय धोनीच्या पाठीशी
आयसीसीने जरी बीसीसीआयला धोनीच्या ग्लोव्ह्जवरील विशेष चिन्ह हटवण्याची विनंती केली असली तरी बीसीसीआय मात्र धोनीच्या समर्थनार्थ सरसरवली आहे. बीसीसीआयने सांगितले आहे की, “आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठीशी ठाम उभं आहोत. धोनीने त्याच्या ग्लोव्ह्जवर लावलेले चिन्ह हे कुठल्या धर्माचं किंवा कुठल्या व्यावसायिक स्वरुपाचं प्रतीक नाही. आम्ही आयसीसीला धोनीला त्याच्या ग्लोव्ह्जवर बलिदान चिन्ह वापरता यावे यासाठी परवानगी मागणार आहोत.” क्रीडाविश्वातील खेळाडूंनी धोनीच्या या कृतीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.