नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या डिग्रीवरुन सध्या वाद सुरु आहेत. निशंक आपल्या नावासमोर डॉक्टर अशी पदवी लावतात. परंतु ते सुई टोचवणारे डॉक्टर नसून एक पीएचडी केलेलं डॉक्टर आहेत.
श्रीलंकेमधील आंतरराष्ट्रीय विद्यापीठामधून त्यांनी दोन दोन डॉक्टरेट पदव्या संपादन केल्या आहेत. परंतु आता त्यांच्या विद्यापीठावरूनच वाद सुरु झाले आहेत. इंडिया टुडेच्या बातमीनुसार हे विद्यापीठ श्रीलंकेत नोंदणीकृतच नाही. पाहूया काय आहे प्रकरण…
अशी मिळाली होती निशंक यांना डिग्री
९० च्या दशकातील गोष्ट आहे. कोलंबो ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने निशंक यांना डी.लिट. (Doctor of Literature) ची डिग्री दिली होती. निशंक यांच्या शिक्षणातील योगदानाबद्दल ही पदवी देण्याचे आली होती. त्यानंतर काही वर्षांनी याच विद्यापीठाने त्यांना अजून एक डी.लिट. डिग्री दिली. यावेळेस त्यांना विज्ञानामधील योगदानाबद्दल ही पदवी दिली होती.
विद्यापीठ नोंदणीकृतच नाही
इंडिया टुडेच्या बातमीनुसार श्रीलंकेतील कोलंबो ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी श्रीलंकेत ना देशी विद्यापीठ म्हणून ना विदेशी विद्यापीठ नोंदणीकृत आहे. श्रीलंकेच्या विद्यापीठ अनुवादां आयोगाने या गोष्टीची खात्री केली आहे. मागच्या वर्षी डेहराडून मध्ये निशंक यांच्या शिक्षणासंबंधी माहिती अधिकाराखाली माहिती मागविण्यात आली होती. परंतु निशंक यांच्याकडून अपूर्ण माहिती देण्यात आल्याने वबाकीच्या गोष्टी समोर येत गेल्या.
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात निशंक यांनी आपल्या शिक्षणाविषयी माहिती देताना सांगितले आहे की, त्यांनी हेमवती बहुगुणा गढवाल युनिव्हर्सिटी मधुन एम.ए. केले आहे. त्यांनी संगितले की त्यांच्याकडे मानद पीएचडी आणि मानद डी.लिट. पदव्या आहेत. परंतू या पदव्या कुठल्या विद्यापीठाकडून आणि कधी मिळाल्या आहेत याविषयी काहीही माहिती दिली नाही.
डिग्रीच्या वादाबद्दल निशंक यांचे काय म्हणणे आहे ?
आपल्या डिग्री वरुन सुरु असणाऱ्या वादाबद्दल निशंक यांनी सांगितले आहे की, “मी काही चुकीचे काम केले नाही, त्यामुळे मला भीती नाही. मी निशंक आहे, ज्याचा अर्थ आहे जो कुणाला घाबरत नाही.” मोदींच्या मागच्या मंत्रिमंडळातील मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरुनही असाच वाद निर्माण झाला होता. तो वाद २०१९ चुका लोकसभा निवडणुकांपर्यंत सुरु होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.