कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात १३०० वर्षांपासून पूजेची परंपरा आहे. येथे आजपर्यंत अनेक शासक आले आणि गेले. महालक्ष्मीची मूर्ती मंदिर बांधकाम होण्याआधीपासून अस्तित्वात आहे. तेव्हापासूनच पूजेची परंपरा कायम चालू आहे.
मंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरुन लक्षात येते की हे मंदिर १८०० वर्ष जुने आहे. शालिवाहन काळात राजा कर्णदेवाने याची उभारणी केली. कालांतराने तेथे अजुन ३० ते ३५ मंदिरे बांधण्यात आली. २७ हजार वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे. आदि शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली होती.
मंदिरात होणारा किरणोत्सवही विशेष असतो. वर्षातुन एकदा महालक्ष्मीच्या मुर्तीवर सुर्यकिरण पडतात. या मंदिराच्या उभारणीत चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरात महालक्ष्मीची 3 फुट उंच चतुर्भुज मुर्ती आहे. काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजे भगवान विष्णुचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापूरला आली.
मंदिरावर तेराव्या शतकापर्यंत शिलाहार घराण्याची सत्ता राहिली. त्यानंतर देवगिरीच्या यादवांचा काळ आला. शेकडो वर्षांच्या उलथापालथीत कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर कायम राहिले. १७१५ मध्ये मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली. देवगिरीत यादवांच्या पराभवानंतर येथील वैभव थोडे कमी झाले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयानंतर पुन्हा गतवैभव प्राप्त झाले.
कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांचे वंशज आजही आहेत. मंदिराजवळील भव्य राजवाडा ही त्यांचीच वास्तू आहे. संभाजी राजे शिवाजी महाराजांच्या वंशपरंपरेतील येथील एक आदरयुक्त व्यक्तिमत्त्व आहे. १९५५ पर्यंत प्राचीन मंदिर छत्रपती घराण्याच्या अधिपत्याखाली होते, आता त्यावर सरकारचे नियंत्रण आहे.
१९५५ मध्ये मूर्तीवर रासायनिक लेप लावण्यात आला होता. महालक्ष्मीची पालखी २६ किलो सोन्यापासून बनलेली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.