‘मोदी है तो मुमकीन है’, या गाण्याचे बोल सार्थ ठरवत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने ३०३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत.
एनडीएचा हा विजय २०१४ पेक्षाही मोठा असल्यामुळे जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाराणसीतून मोदी यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत विजय संपादन केला आहे. मोदींनी तब्बल ३ लाख ८४ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये मोदी ३ लाख ८२ हजार मतांच्या फरकांने विजयी झाले होते.
लोकसभेत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवताना गतवेळपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत थेट तीनशेपार मजल मारली. बहुतांश राज्यांत निर्विवाद यश मिळवले. पण एका मतदारसंघात मात्र भाजपाचा दारुण पराभव झाला. अवघ्या सव्वाशे मतांवर भाजपाला समाधान मानावे लागले आहे.
या मतदारसंघाचे नाव आहे लक्षद्वीप. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपमध्ये भाजपाने कादर हाजी यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना मतदारसंघात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना अवघ्या १२५ मतांवर समाधान मानावे लागले. केवळ नोटाला भाजपापेक्षा कमी म्हणजे १०० मते मिळाली.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद फैजल यांनी विजय मिळवला. त्यांना २२ हजार ८५१ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे हमदुल्ला सईद यांना २२ हजार २८ मते मिळाली. हा एकमेव मतदारसंघ वगळता भाजपाची फारशी ताकद नसलेल्या इतर मतदारसंघांमध्येसुद्धा भाजपाच्या उमेदवारांनी समाधानकारक मतदान झाले.
२०१४ मध्ये मोदी लाटेत देखील मोहम्मद फैजल यांनी लक्षद्वीप मधून विजय मिळवला होता. मोहम्मद फैजल यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे.
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४१ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या. त्यापैकी भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीला ५ , काँग्रेसला १ आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा जिंकता आली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.