खाण्यापिण्याच्या बाबतीत भारतीय लोक कोणालाच पुढे जाऊन देणार नाहीत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय लोक जिभेचे चोचले पुरवण्यातच व्यस्त असतात. पण यात तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.
एका संशोधनात्मक बातमीनुसार जे लोक सकाळचा नाश्ता करत नसतील त्यांच्या आरोग्यासाठी नंतर धोका संभवण्याची शक्यता असल्याची बाब समोर आली आहे. जाणून घेऊया नेमका काय धोका आहे…
बातमीनुसार ज्या लोकांना सकाळचा नाश्ता करण्याची सवय नाही, अशा लोकांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वाईट परिणाम भोगावे लागण्याची शक्यता असते. अशा पेशंटला दवाखान्यातुन सुट्टी भेटल्यानंतर ३० दिवसांच्या आतच त्याच्यावर चार ते पाच वेळा मृत्यूच्या जवळ जाण्याचा, अजून एक झटका येण्याचा किंवा छातीत दुखण्याचा प्रसंग उद्भवला आहे. रात्रीच्या जेवण आणि झोपण्यामध्ये दोन तासांचे आंतर असायला हवे असे या शोधातून समोर आले आहे.
हार्टकेअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.के.के.अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, भारतीयांमध्ये पोटाच्या चारी बाजूंना चरबी जमा होण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे इन्सुलिनला प्रतिबनध होतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात आणि दिवसाच्या इतर वेळी फास्टफूड खात बसतात. स्वस्थ जीवनशैली ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता आणि माध्यम स्वरूपाचा व्यायाम करायला हवा. त्यामुळे मधुमेहासारख्या रोगाची शक्यता ५०% कमी होते.
जे लोक जाड असतात त्यांनी जेवणात जटिल अशा कार्बोहायड्रेटच्या सेवनाचे प्रमाण कमी करण्याचे ध्येय ठेवायला हवे. कारण ते रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची निर्मिती वाढवतात. अशा लोकांमध्ये टाईप-२ मधुमेहाचा धोका असतो.हा मधुमेह सायलंट किलर म्हणूनही ओळखला जातो.
त्यामुळे लोकांच्या वजनात वाढ होऊ शकते. हा त्रास टाळण्यासाठी आठवड्यातून पाच दिवस रोज ३० ते ४५ मिनिट शारीरिक हालचाली करण्याचे ध्येय ठेवायाला हवे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.