सुरतच्या तक्षशिला मार्केटमध्ये काल एका बिल्डिंगला लागलेल्या आगीत २३ निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीला लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि अडकलेल्या लोकांनी उड्या टाकल्या.
तसेच इतर काही लोकांनीही इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या टाकल्या. उद्या टाकणाऱ्यांपैकी देखील काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तक्षशिला इमारतीत बरीच शॉपिंग सेंटर्सही आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दीही असते.
या कॉम्लेक्समध्ये ज्यावेळी आग लागली त्यावेळी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस मध्ये जवळपास ६० विद्यार्थी होते. सर्वात अगोदर आग तिसऱ्या मजल्यावर लागली होती. त्यावेळी एकच गोंधळ उडाला आणि सर्वानी पळायला सुरुवात केली. बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा असल्याने अनेकांनी दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या. जवळपास १५ विद्यार्थ्यांनी वरून उड्या मारल्या. त्यातील ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
तरुणाने वाचवले १२ विद्यार्थ्यांचे प्राण-
आग लागल्यानंतर लोकांनी अग्निशमन दलाला खूप कॉल केले. पण अग्निशमनची गाडी अर्ध्या तासानंतर आली. तोपर्यंत तेथील लोकांनी देखील विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यामध्ये एक तरुण तर बिल्डिंगवर चढला आणि आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले.
या विद्यार्थ्यांना वाचवणारा तो तरुण होता केतन जोरवाडिया. केतन हा दुसऱ्या मजल्यावर चढला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थ्यांना खाली घेताना दिसत आहे. तो केतन होता. केतन आग लागली त्यावेळी कॉम्प्लेक्ससमोरून जात होता.
केतनने सांगितले कि त्याला अगोदर धूर दिसला. त्यावेळी काय करावे सुचत नव्हते पण तेथून एक शिडी उचलली आणि दुसऱ्या मजल्यावर चढून अगोदर २ विद्यार्थ्यांना वाचवले. नंतर १०-१२ विद्यार्थ्यांना खाली उतरण्यास मदत केली. चेतनच्या मते फायर ब्रिगेडला तिथे पोहचायला ४०-४५ मिनिटे लागली. तेथील लोकांनी सांगितले कि अग्निशमनच्या गाड्या आल्यानंतर त्यांना तयारी करण्यास देखील बराच वेळ लागला आणि त्यांच्या शिड्या देखील काम करत नव्हत्या.
या अग्नितांडवात जास्तीत जास्त जीव हे चौथ्या मजल्यावर असलेल्या फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे गेले आहेत. या विद्यार्थ्यांचे मृतदेह रुग्णालयात पोहचले तेव्हा त्यांचे मृतदेह खूप वाईट अवस्थ्येत होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.