या दशकाचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच नवीन कार घेतलेली आहे. आणि हि कार महागड्या मर्सडीज या कंपनीची आहे. अमिताभ बच्चनने कार घ्यावी आणि चर्चा होणार नाही असे शक्य आहे का ? या अगोदर त्यांच्या कडे लैंड रोवर रैंज रोवर ऑटोबॉयोग्राफी, रॉल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज बेंज एस-क्लास आणि बेंटले कॉन्टेंसटल जीटी ह्या गाड्या होत्या. सध्या त्यांनी देशातील सर्वात महाग मल्टी पर्पज व्हीकल म्हणजे एमपीवी विकत घेतलेली आहे.
एमपीवी गाड्या ह्या आपल्या लक्सरी आणि शानदार इंटेरियर करिता ओळखण्यात येतात. त्यांनी विकत घेतलेली कार आहे मर्सिडीज बेंज V-Class ती सध्या भारतातील सर्वात महाग एमपीवी कार आहे. तिची सध्याची बेसिक कारची शोरूम किंमत भारतात 68.4 लाख एवढी आहे. त्यामधील सुविधामुळे या कारला एमपीवी सेग्मेंट मध्ये एस क्लास म्हणून ओळखल्या जाते.
अमिताभ यांनी याच वर्षी आपली रॉल्स रॉयस घोस्ट 6 हि एका उद्योगपत्यास विकली होती. हि गाडी ३.५ करोड रुपयात मैसूर येथील उद्योगपती रुमान खान यांना विकली होती. २००७ पासून हि कार अमिताभ बच्चन यांच्या कडे होती. अमिताभने घेतलेली टॉप एंड V-Class Exclusive Extra Long wheelbase किंमत ८२ लाख पर्यत आहे.
याच्या long wheelbase मध्ये ६ सीट येतात आणि xtra Long wheelbase मध्ये ७ सिट आहेत. मागील sit करिता या मध्ये स्लायडिंग डोअर वापरण्यात आलेले आहे. या गाडीत अनेक हाय एंड फिचर आहेत या मध्ये मधली सीट हि १८० डिग्री पर्यंत फिरू शकते. यामुळे मागे बसलेल्या लोका सोबत आरामात बोलू शकतो.
या मध्ये अम्बियंस लाईट सिस्टीम आहे जी लाईट नुसार बदलत राहते. या मध्ये मर्सिडीज ऑडियो 20 इंफोटेनमेंट सिस्टीम लावलेला आहे. ज्यामुळे नेवीगेशन आणि मल्टीमिडियाचा आनंद घेता येतो. या सोबतच 6 एयरबैग्स, अटेंशन असिस्ट, क्रासविंड असिस्ट, कोलिजन प्रीवेंशन असिस्ट, हेंडलैंप असिस्ट, टायरप्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, 360 डिग्री कैमरा, लेन असिस्ट आणि एक्टिव पार्क असिस्ट ह्या सुविधा आहेत.
V क्लास मध्ये 2.1 लीटरचे बीएस-6 डीजल इंजिन आहे. हि एमपीवी फक्त 10.9 सेकंद मध्ये 100 किमी प्रती तास स्पीड घेऊ शकते. या कारला भारतात सध्या टक्कर कोणीच देऊ शकत नाही लवकरच टोयोटा आपली Alphard एमपीवी यासाठी बाजारात उतरवणार आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा.