‘मोदी है तो मुमकीन है’, या गाण्याचे बोल सार्थ होताना दिसत आहेत. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने ३०३ च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत.
एनडीएचा हा विजय २०१४ पेक्षाही मोठा असल्यामुळे जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान भाजपने आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तर मोदी २६ मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
वाराणसीतून मोदी यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत विजय संपादन केला आहे. मोदींनी तब्बल ३ लाख ८४ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये मोदी ३ लाख ८२ हजार मतांच्या फरकांने विजयी झाले होते.
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४१ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीला ५ , काँग्रेसला १ आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा जिंकता आली आहे.
जाणून घेऊया महाराष्ट्रात कोण सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आलं-
महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने उत्तर मुंबईमधून भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल ४ लाख ६५ हजार मतांनी पराभव केला आहे.
जळगावमध्ये तिकीट वाटपावरून भाजपमध्ये मोठा गोंधळ झाला होता. २ वेळा खासदार राहिलेल्या ए टी पाटील यांचे तिकीट कापून अगोदर स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या ऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. उन्मेष पाटील यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी ४ लाख ११ हजार मतांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव केला आहे.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्य घेणारे उमेदवार ठाण्याचे शिवसेनेचे राजन विचारे ठरले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा तब्बल ४ लाख १२ हजार मतांनी पराभव केला आहे. तसेच कल्याण मधून शिवसेनेच्याच डॉ श्रीकांत शिंदे यांनी देखील मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा ३ लाख ४४ हजार मतांनी पराभव केला आहे.
रावेरमधून एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या डॉ उल्हास पाटील यांचा ३ लाख ३५ हजार मतांनी पराभव केला आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा ३ लाख ३२ हजार मतांनी पराभव केला आहे. याशिवाय पुण्यातून गिरीश बापट यांनी देखील मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा ३ लाख २४ हजार मतांनी पराभव केला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.