देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास २०१४ च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल असे चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. १२ वाजेपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात एका जागेवर तर राष्ट्रवादी ४ आणि वंचित बहुजन आघाडीने एका जागेवर आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे या विजयी होतात का याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. इथे सुप्रिया सुळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास १ लाख मतांची आघाडी त्यांनी घेतली आहे. बारामतीतून सुप्रिया सुळेंचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
तर पवार घराण्याचे वारसदार पार्थ पवार हे मावळमधून मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. जवळपास दीड लाखाच्या फरकाने शिवसेनेचे श्रीरंग बारणे पुढे आहेत. मावळमधून श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
नगरमधून भाजपच्या सुजय विखेंनी देखील १ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांचे मोठे आव्हान होते. पण सुजय विखे हे बाजी मारताना दिसत आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
बीडची लढत रंगतदार होईल अशी चर्चा होती. पण इथे प्रीतम मुंडेंनी मोठी आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
जालन्यामधून रावसाहेब दानवे यांनी मोठी आघाडी घेतली असून त्यांचाही विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. याशिवाय मुंबई उत्तर मधून गोपाळ शेट्टी , कोल्हापूरमधून शिवसेनेचे संजय मंडलिक, हिंगोलीमधून शिवसेनेचे हेमंत पाटील, अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे, मुंबई दक्षिण मध्य मधून राहूल शेवाळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.